वेगवेगळ्या फुलांनी दिंडी सजवण्यात आली होती. दिंडीत वेगवेगळी पुस्तकांसह महात्मा बसवेश्वर व्यक्ती आणि वाड;मय, तसेच जननायक अण्णाभाऊ साठे, ज्ञानेश्वरी, संविधानाची सत्य प्रत देखील ठेवण्यात आली होती.
हे संमेलन उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय या ठिकाणी २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे या संमेलनाचे अध्यक्षपद भुषणार आहेत.
संम्मेलनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, कार्यवाहक रामचंद्र तिरुके यांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीचे पुजन करण्यात आले.
टाळ्यांच्या गजर, डोक्यावर कलश आणि ढोल ताशा पथकाच्या निनादात ग्रंथ दिंडी निघाली. ग्रंथदिंडीनंतर सकाळी १० वाजता ध्वजारोहण पार पडले. या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
आजपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरात रांगोळ्याचा सडा घालण्यात आला होता.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2022ग्रंथ दिंडी मध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी वेगवेगळी वेशभूषा परिधान करुन ग्रंथ दिंडी मध्ये सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.