Prithviraj Chavan : आमदार, खासदार, राज्यमंत्री ते मुख्यमंत्री... पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकिय प्रवास

Karad माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा आज (शुक्रवारी) वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा....
MLA Prithviraj Chavan
MLA Prithviraj Chavansarkarnama
Published on
Prithviraj Chavan With Manmohan Singh
Prithviraj Chavan With Manmohan Singhsarkarnama

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan प्रथम १९९१ मध्ये काँग्रेसमधून कऱ्हाड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. १९९६ व १९९८ च्या निवडणुकीत पुन्हा लोकसभेवर निवडून आले. २००२ ते २००८ कालावधीत त्यांनी लोकसभेवर प्रतिनिधीत्व केले.

Prithviraj Chavan With Union Ministers
Prithviraj Chavan With Union Ministerssarkarnama

संसदेच्या सार्वजनिक उपक्रम, विज्ञान व तंत्रज्ञान, वित्त व नियोजन, लोकलेखा, ऊर्जा आणि संगणकीकरण इत्यादी महत्वाच्या समित्यांवर त्यांनी काम केले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Prithviraj Chavan With Rahul Gandhi
Prithviraj Chavan With Rahul Gandhisarkarnama

भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी विश्व संसदीय संघटनेच्या लंडन, पॅरिस, जिनेव्हा आणि टोकियो येथील अधिवेशनामध्ये त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधीत्व केले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने १९९५ च्या इंग्लंडच्या सत्ताधारी हुजुर पक्षाच्या वार्षिक अधिवेशनात ते प्रतिनिधी होते.

Prithviraj Chavan With Soniya Gandhi
Prithviraj Chavan With Soniya Gandhisarkarnama

१९९८ मध्ये ते पहिल्या भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाच्या दौऱ्यावर ते पाकिस्तानला गेले. १९९३ मध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीवर ते प्रथम निवडून आले. संसदीय पक्षाचे उपप्रतोद, सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवडून येत राष्ट्रीय प्रवक्ते, आर्थिक धोरण समिती सदस्य, आत्मचिंतन समिती सदस्य, धोरण व निर्धारण समितीचे अध्यक्ष, केंद्रीय निरीक्षक आदी महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे.

Prithviraj Chavan speak with Media
Prithviraj Chavan speak with Mediasarkarnama

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले. यातून त्यांनी गुजरात, कर्नाटक, जम्मू काश्मीर, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर व सिक्कीम या राज्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी पेलली आहे.

Prithviraj Chavan along with his Wife Satvasheela chavan
Prithviraj Chavan along with his Wife Satvasheela chavansarkarnama

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, टोल फ्री १०८ रुग्णवाहिका या ऐतिहासिक निर्णयाबरोबर त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन सुखी राहणाऱ्या अनेक योजना व कामे साकारली. आमदार चव्हाण वाढदिनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कराड येथील निवासस्थानी शुभेच्छा स्विकारणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com