राऊत आणि पाटील यांच्यातील सव्वा रुपयाचे भांडण!

शिवसेनेने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर सामनाच्या अग्रलेखातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला
Sanjay Raut- Chandrkant Patil
Sanjay Raut- Chandrkant Patil Sarkarnama
Published on

मुंबई : शिवसेनेने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर सामनाच्या अग्रलेखातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत पाटलांनी संजय राऊतांना पत्र पाठवलं. या पत्रानंतर दोघांमध्येही शाब्दिक चकमकी सुरु आहेत.

Sanjay Raut- Chandrkant Patil
Sanjay Raut- Chandrkant Patil Sarkarnama

या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या पत्नीवरील पीएमसी बॅंक घोटाळ्याच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. "मला ईडीचा अनुभव नाही. पण इडीचा अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केल्यावर ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केलात. हे सर्व पाहिल्यावरून मला वाटले की, पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार,” असा खोचक टोला त्यांना लगावला होता.

Sanjay Raut- Chandrkant Patil
Sanjay Raut- Chandrkant Patil sarkarnama

याला संजय राऊत यांनीही पलटवार करत चंद्रकांत पाटलांवर निशाना साधला. ''भाजपची (BJP) दळभद्री आरोप करण्याची संस्कृती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी जे काही आरोप केलेत ते मला मान्य नाही. यासाठी पुढच्या चार दिवसांत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा नाही तर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार,' असल्यांच त्यांनी म्हटलं.

Sanjay Raut- Chandrkant Patil
Sanjay Raut- Chandrkant Patil Sarkarnama

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा संजय राऊतांना प्रत्युत्तर देत त्यांना चिमटा काढला. ''कोणी शंभर कोटी, कोणी दोनशे कोटीचा मानहानीचा दावा करतं पण संजय राऊत सव्वा रुपयांचा करणार आहेत, पण माझे मित्र म्हणून मी त्यांना सव्वा रुपयाची किंमत वाढवण्याचा सल्ला देईल,संजय राऊतांनी मानहानीची किंमत वाढवावी, मी चिमटा काढतो जखम करत नाही. अशा खोचक शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (ChandraKant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) पलटवार केला आहे.

Chandrkant Patil- Sanjay Raut
Chandrkant Patil- Sanjay Raut Sarkarnama

खरंतर दोघांमधील वादाची सुरुवात गेल्या आठवड्यातच झाली होती. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, मला माजी मंत्री म्हणू नका, दोनतीन दिवसांत कळेल, असंही त्यांनी म्हटलं. पाटलांच्या या वक्तव्याला संजय राऊतांनी टोला लगावला होता. पुढची २५ वर्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्रीच राहतील, तसंच, भविष्यात जमलं तर माजी बिरुदावली काढून दाखवा, असं आव्हान देखील दिलं.

Chandrakant Patil - Sanjay Raut
Chandrakant Patil - Sanjay Raut Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com