सरकारनामा Open Mic : सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय मैफिलीत उडवली धमाल

नेहमीचे राजकीय भाषण, दौरे, डावपेच, टिकाटिपण्णीअशा सगळ्या वातावरणातून बाहेर येवून सरकारनामा ओपन माईक चॅलेंज या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी धमाल उडवून दिली.
सरकारनामा Open Mic, Sarkarnama Open Mic
सरकारनामा Open Mic, Sarkarnama Open MicSarkarnama
Published on
सरकारनामा Open Mic
सरकारनामा Open MicSarkarnama

या कार्यक्रमासाठी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख व भाजपचे आमदार परिणय फुके उपस्थित होते. हा कार्यक्रम येत्या 1 मे रोजी 'सरकारनामा' च्या फेसबुक, यु ट्यूब आणि ट्विटरवरून प्रसारित केला जाणार आहे. (Sarkarnama Open Mic)

सरकारनामा Open Mic
सरकारनामा Open MicSarkarnama

शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पागोष्टी मारल्या, अराजकीय प्रश्नांना उत्तर दिले. पहिल्यांदा 'हिट वेव्ह' राऊंडमध्ये उपस्थित 5 ही नेत्यांनी एकमेकांना राजकीय, अराजकीय टोकदार प्रश्न विचारले.

सरकारनामा Open Mic
सरकारनामा Open MicSarkarnama

याला प्रत्येकाने हसतखेळत आणि चतुराईने उत्तरे दिली. यानंतर प्रत्येक नेत्याला विविध क्षेत्रातील 10 व्यक्तींची छायाचित्रे दाखवण्यात आली. त्या प्रत्येक व्यक्तीविषयी एका शब्दात प्रतिक्रिया द्यायची होती. तसेच त्या एका शब्दाबद्दल म्हणजे तोच एक शब्द का वापरला, यावर स्पष्टीकरण द्यायचे होते. त्यातही या नेत्यांनी आपले कसब पणाला लावले.

सरकारनामा Open Mic
सरकारनामा Open MicSarkarnama

अंतिम फेरीत पाचही नेत्यांनी आपले महाराष्ट्राबद्दलचे व्हिजन मांडले. राज्यातील सध्याच्या राजकारणात आलेली कटुता घालविण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त असल्याची भावना सर्वांनी व्यक केली.

सरकारनामा Open Mic
सरकारनामा Open MicSarkarnama

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि रेडिओ मिरचीचे आरजे राहुल यांनी नेत्यांना बोलते केले. सर्व नेत्यांनी शेवटपर्यंत हसतखेळत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

सरकारनामा Open Mic
सरकारनामा Open MicSarkarnama

या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व दिलेले व्यंकटेश बिल्डकॉनचे अंकुश आसबे, आयकॉन 51 प्रकल्पाचे सचिन तोष्णीवाल, महावीर चोरडिया सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया, हॉटेल 24 के क्राफ्ट ब्रिझचे राजेश करंदिकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com