आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल कोण?

युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरी प्राप्तिकर विभागाने सकाळी छापा मारला.
Rahul kanal- Mayor Kishori pedanekar
Rahul kanal- Mayor Kishori pedanekar
Published on
Rahul kanal- Aditay thackeray
Rahul kanal- Aditay thackeray

कनाल हे युवासेनेचे प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. राहुल कनाल यांचे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचेही दिसून आले आहे.

Rahul kanal- Anil parab- aditya Thackeray
Rahul kanal- Anil parab- aditya Thackeray

याशिवाय परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरावरही छापेमारी झाल्याचे समजते.

rahul kanal- Aditya Thackeray -Kishori pedanekar
rahul kanal- Aditya Thackeray -Kishori pedanekar

राहुल कनाल हे उद्योजक आहेत. ते युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. राणे यांनी कनाल यांच्यावर मुंबईच्या नाईट लाईफ गॅंगचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे.

मंत्री एकनाथ शिंदेंसोबत राहुल कनाल. कनाल मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. ते शिक्षण समितीवरही होते. राहुल कानल हे शिर्डी संस्थानचे विश्वस्त आहेत.

आमदार नितेश राणे यांनी कनाल यांचा दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी संबंध जोडला आहे. राहुल कानाल यांचाही युवासेनेच्या कोअर कमिटीत समावेश आहे.

Rahul kanal- Yashwant jadhav
Rahul kanal- Yashwant jadhav

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित करचोरी प्रकरणी आयकर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. राहुल कनाल हा आदित्य ठाकरेंच्या टीमचा एक चेहरा आहे.

CM Uddhav Thackeray- Rahul kanal
CM Uddhav Thackeray- Rahul kanal

राज्यपालांनी नियुक्त केलेल्या आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची चर्चा होती. तसेच शिर्डीच्या संस्थांनावर नेमणूक करण्याइतकी त्याच्यावर कोणाची एवढी कृपादृष्टी आहे? त्याच्याकडे एवढा पैसा आला कोठून? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Rahul kanal- Ramdas kadam
Rahul kanal- Ramdas kadam

राहुल हे कनाल महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्यही आहेत. राहुल कनाल यांची अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत उठबस आहे. त्यांचे सलमान खान, संजय दत्तपासून अनेक अभिनेत्यांपर्यंत फोटो आपल्याला दिसतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com