Kolhapur News : जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरवात

Kolhapur Hoarding News : महापालिकेकडे असलेल्या परवानगीपेक्षाही अनेक मोठी होर्डिंज अनधिकृत असल्याचे तपासणीत आढळून येत आहे.
kolhapur administration remove illegal hoarding
kolhapur administration remove illegal hoardingsarkarnama

Kolhapur News, 17 May : मुंबईच्या घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ( ghatkopar hoarding accident ) घडल्यानंतर कोल्हापूर ( Kolhaur ) जिल्हाप्रशासनाला जाग आली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह आयुक्त सक्रिय झाले आहेत. कोल्हापूर शहरात अनधिकृतपणे लावलेले होर्डिंग काढण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने सुरू केले आहे. मुंबईतील दुर्घटना घडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने विनापरवाना उभा केलेल्या होर्डिंग मालकांना नोटीस पाठवत शहरातील 20 ते 25 अनाधिकृत होर्डिंग काढण्यात आले. काही होर्डिंग स्वतः मालकांनी काढून घेतले. तर काही होर्डिंग कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढण्यास सुरवात केली आहे. जिल्हाधिकारी अमोल गेडगे यांनी देखील बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

महापालिकेकडे असलेल्या परवानगीपेक्षाही अनेक मोठी होर्डिंज अनधिकृत असल्याचे तपासणीत आढळून येत आहे. तसेच, परवानगीच्या आडून कुणी अधिकचे होर्डिंग उभी केली आहेत का? याचीही तपासणी केली जात आहे. आतापर्यंत याकडे लक्ष दिले नसल्याचेच स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक इमारतींवर होर्डिंग्ज आहेत. ती लोखंडी स्ट्रक्चरवर उभी राहिली आहेत. तसेच, अनेक उंच इमारतींवरही स्ट्रक्चरच्या आधारे उभी केली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील दुर्घटनेत परवानगी असलेले होर्डिंग्ज पडल्याने कधी, कशाची वेळ येईल हे सांगता येत नसल्याची नागरिकांत चर्चा आहे. बहुतांश होर्डिंग्ज रस्त्याशेजारी आहेत. त्यामुळे महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीची मोहिम सुरू केली आहे. त्यात परवानगी आणि प्रत्यक्ष जागेवरील स्थिती तपासली जात आहे. त्यामुळे घराच्या बांधकामाप्रमाणे वाढीव काम झाले आहे का? याचाही शोध घेतला जात आहे.

kolhapur administration remove illegal hoarding
Vishal Patil News : संजयकाकांची कदमांवर सडकून टीका, मित्र विशाल पाटलांनी ढाल बनून जशास तसं दिलं प्रत्युत्तर

20 ते 22 होर्डिंग उतरवले

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रशासन अलर्ट झाले आहे. गुरूवारी नोटीस लागू केलेल्या हॉकी स्टेडियम येथील अनधिकृत 40 बाय 20 फुटांचे होर्डिंग मालकांनी स्वतःहून उतरवून घेतले. आरोग्य निरीक्षकांमार्फत शहरामध्ये सर्व्हे करण्यात येणार असून विनापरवाना आणि परवानाधारक होर्डिंग यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी दिले आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

kolhapur administration remove illegal hoarding
Vishal Patil News : ही दोस्ती तुटायची नाही, माझं विमान पायलटनं दिल्लीला लॅण्ड केलंय; विशाल पाटलांचं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com