Lok Sabha Election : अनुभवी कार्यकर्त्यांना भाव, मतमोजणीवेळी परफेक्ट आकडेमोड करणाऱ्यांचा शोध

Hatkanangle Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यामुळे अशा अनुभवी कार्यकर्त्यांचा आणि मतमोजणीच्या तांत्रिक, आकडेमोड करणाऱ्या कार्यात पटाईत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध उमेदवारांकडून सुरू आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक या निवडणुकीत  प्रत्येक नेत्याकडे  एक तरबेज कार्यकर्ता  असतो. वेगवेगळ्या कामात पटाईत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध नेते घेतच असतात. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यामुळे अशा अनुभवी कार्यकर्त्यांचा आणि मतमोजणीच्या तांत्रिक, आकडेमोड करणाऱ्या कार्यात पटाईत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध उमेदवारांकडून सुरू आहे. काही जणांनी याची तयारी पूर्ण केली असून उद्या प्रत्यक्षात अशा कार्यकर्त्यांची फौज मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित असणार आहे.

निवडणूक कोणतीही असो त्या निवडणुक निकालाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. मतमोजणी प्रक्रियेत एक-एक मताचे महत्त्व अधिक असते. त्यावेळी या कामात पटाईत असणारा कार्यकर्ता त्यावेळी महत्त्वाचा असतो. पडलेली मते आणि पडणारी मते याचं गणित साधून निकाला आधीच विजय सांगणारा कार्यकर्ता या मतमोजणी प्रक्रियेत वरचढ ठरत असतो.

गेल्या महिनाभरापासून धुराळा उडालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या 4 जून रोजी आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांकडून मतमोजणी प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे. यासाठी आपल्या विश्वासातील कार्यकत्यावर ही जबाबदारी दिली आहे. प्रत्येक उमेदवाराला 105 मतमोजणी प्रतिनिधी देण्याची मुभा असते. विधानसभा, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उशीरपर्यंत चालत असल्याने त्या ठिकाणी संयम ठेवून तांत्रिक गणिते करत परफेक्ट आकडेमोड करणारा कार्यकर्ता गरजेचं असतो. अशाच कार्यकर्त्यांची निवड उमेदवारांनी केली आहे. तर काही उमेदवारांकडून अशा कार्यकर्त्यांचा शोध सुरु आहे.

टेबलसाठी एक असे ८४ यासह टपाल व इतर ठिकाणी असे १०९ प्रतिनिधींची नेमणूक प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी केली आहे. अनुभवी कार्यकत्यासह प्रमुख उमेदवारांकड्न
मोजणीच्या ठिकाणी तज्ज्ञ वकिलांची टीमही तयार ठेवली जाणार आहे. मतमोजणीवेळी एखाद्या फेरीत दोष अढळल्यास त्यावर या वकिलांचा सल्ला घेऊन त्यावर आक्षेप घेण्याची तयारी उमेदवारांनी केली आहे.

Lok Sabha Election
Sunil Tatkare : पक्षाला अपयशाचे तोंड पाहावे लागले,तर तटकरेंना हिशेब द्यावाच लागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com