

पंढरपूर : राज्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात गेल्या सात वर्षांपूर्वी मी ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. सध्या मात्र, राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी इन्कम टॅक्सकडून धाडी टाकल्या जात आहेत, असा गंभीर आरोप करत मोदी सरकारचा तो एक 'स्टंट' असल्याचं सांगत धाडी टाकल्यानंतर त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांचे साखर कारखाने लूटणाऱ्यांबरोबर आम्ही कदापि जाणार नाही, असे यावेळी राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात शेतकरी मेळावे घेतले आहेत. आज पंढरपुरातील शेतकरी मेळाव्यासाठी श्री. शेट्टी आले होते. शेतकरी मेळाव्यापूर्वी राजू शेट्टी यांनी आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्या कारखान्यावर व मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने टाकलेल्या धाडीवर बोलताना धाडी टाकून सरकार मांडवली करत असल्याचे त्यांनी सांगितले. लखीमपूर घटना दुर्दैवी आहे. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद' केला जाणार असेल, तर आम्ही देखील या बंदमध्ये सहभागी होऊ. या घटनेचा निषेध करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. ज्या कारखान्यांनी अद्यापही एफआरपीची रक्कम दिली नाही, असे कारखाने सुरू होणार असतील तर या कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून कारखाने बंद पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.