Kolhapur Politics : कोल्हापुरात कोण आहे 'टक्केवारीचा राजा'?

Sanjay Pawar Criticized on 100 cr road : रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वीच 100 कोटींच्या श्रेयाची लढाई, ठाकरे गटाच्या संजय पवारांनी काढले वाभाडे
Kolhapur Politics : कोल्हापुरात कोण आहे 'टक्केवारीचा राजा'?
Sarkarnama
Published on
Updated on

चार दिवसांपूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी एकत्र केलेली बुलेट सवारी सर्वांनी पाहिली. यावरून आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कोल्हापुरातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. या दोन्ही नेत्यांना कोल्हापूरच्या प्रश्नांची जाण असेल तर त्यांनी हीच बुलेट सवारी चाळण झालेल्या रस्त्यांवरून करून कोल्हापूरकरांची दुखणी जाणून घ्यावी, असा टोला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी लगावला आहे.

Kolhapur Politics : कोल्हापुरात कोण आहे 'टक्केवारीचा राजा'?
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत उमेदवारांची 'लपवाछपवी'

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) 3 आणि 4 जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एक सभा होणार आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर ठाकरे गटाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात दोन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार असतील, असा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील दोन्ही बाजूंच्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. मात्र आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात जास्तीत जास्त युवा वर्गाचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत, त्या जागा आम्हालाच पाहिजेत. शेवटी जागा द्यायच्या की नाही द्यायच्या हे वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल, पण कोल्हापुरातल्या दोन्ही जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे, असेही पवार यांनी ठासून सांगितले.

Kolhapur Politics : कोल्हापुरात कोण आहे 'टक्केवारीचा राजा'?
Nashik Politics : 'विद्यापीठ कुलगुरुंचे डोके ठिकाणावर आहे काय?' ; संभाजी ब्रिगेडचा इशारा...

उमेदवारीचा वाद सुरू असतानाच कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी आणल्याचे श्रेय कुणाला द्यायचे, यावरून राजकारण सुरू आहे. रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदार निश्चित झालेला आहे. पण या कामाचा शुभारंभ कुणी करायचा, यावरून रस्सीखेच सुरू आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करणार. त्यावरून संजय पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

'लग्न आधी आणि मग मुलगी बघण्याचं काम प्रशासनाचं सुरू आहे. वराती मागून घोडं कशासाठी चाललं आहे? हे सर्व कोल्हापूरकरांना कळत आहे. शहरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे ते रस्ते प्रथम करा. सरकारचे पैसे कुणाचा बालहट्ट पुरवण्यासाठी केला जात आहे? स्वतः कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणत आहेत की, हे काम टक्केवारीसाठी थांबले आहे.

टक्केवारीचा राजा कोण आहे? याची चर्चा सर्वत्र आहे. टक्केवारीच्या या राजावर गृहमंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी,' अशी मागणी संजय पवार यांनी केली आहे.

Kolhapur Politics : कोल्हापुरात कोण आहे 'टक्केवारीचा राजा'?
Uddhav Thackeray On Elections : लोकसभा निवडणुका 'या' तारखेला; उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com