Amal Mahadik : निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी घेरले; अखेर भाजप आमदाराने स्वतःची तिजोरी उघडली

BJP MLA Amal Mahadik : कोल्हापूरातील खराब रस्त्यांवरून विरोधकांनी महायुतीला घेरले असताना भाजप आमदार अमल महाडिक यांनी स्वतःच्या निधीतून पॅचवर्क सुरू केले आहे.
BJP MLA Amal Mahadik personally funding road patchwork in Kolhapur as opposition targets the ruling alliance over worsening road conditions ahead of municipal elections.
BJP MLA Amal Mahadik personally funding road patchwork in Kolhapur as opposition targets the ruling alliance over worsening road conditions ahead of municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Roads : अवकाळी आणि दीर्घकाळ पडणाऱ्या पावसाने कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण केली आहे. अशातच महायुती सरकारने 100 कोटी रुपये रस्त्यासाठी दिल्याचे नेते वारंवार सांगत असताना रस्त्यांची अवस्था आणखी दयनीय बनल्याने त्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मुद्द्यावरून कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून महायुतीला घेरण्याचं षडयंत्र सुरू आहे.

मात्र अशातच भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी स्वतःची तिजोरी उघडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आचार संहितांमध्ये कामे अडकण्याची भीती निर्माण झाली असताना आमदार महाडिक आणि मित्र वर्ग एकत्र येत शहरातील रस्त्यांची पॅचवर्क सुरू केले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर महायुती मधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा ओढा वाढलेला आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडे काँग्रेस एकमेव मजबूत आहे. महायुतीला घेरण्यासाठी महाविकास आघाडीकडून रस्त्यांची झालेली दुरावस्था यावरून आरोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या 100 कोटी पैकी आतापर्यंत 23 कोटी रुपये इतका निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र या 23 कोटी मधील रस्त्यांची अवस्था देखील तितकीच दयनीय बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेकडून होत आहे.

नगरपालिका निवडणूक लागल्यानंतर आचारसंहिता लागली आहे. त्यातच महानगरपालिकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे निधी अभावी तांत्रिक कचाट्यात पाठपुरावाचा प्रस्ताव ओळखण्याची भीती असल्याने भाजपचे दक्षिणचे आमदार महाडिक आणि त्यांच्या मित्र सहकार्याने वेगळाच फंडा राबवला आहे.

BJP MLA Amal Mahadik personally funding road patchwork in Kolhapur as opposition targets the ruling alliance over worsening road conditions ahead of municipal elections.
Kolhapur Municipal Reservation: कोल्हापूर महापालिकेच्या आरक्षणानंतर महायुतीसमोर मोठं आव्हान, आघाडीसाठीही खेळ सोपा नसणार

आमदार अमल महाडिक यांच्याकडून जवळपास चार ते पाच कोटींचा निधी स्वतःच्या तिजोरीतून खर्च करून पुरातील उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शहरातील रस्त्यांची पॅचवर्क सुरू केले आहे. कोल्हापुरातील ताराराणी चौक, सायबर चौक रोड, छ.संभाजीनगर चौक, हॉकी स्टेडियम या सह शहरातील प्रमुख भागातील रस्ते पॅचवर्क करण्यात आले आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते किंवा रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम आमचे आहे. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले. ना जर त्यामुळे त्रास होत असेल. आणि निधीच्या पूर्ततेसाठी लागत असेल. तर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळे कोल्हापूर वासियांना मी आवाहन करतो की राज्य सरकारकडून निधी वेळेत येईल किंवा त्याला उशीर होईल. सर्वांच्या मदतीने कोल्हापुरातील रस्ते सुस्थितीत करूया. त्यासाठी आम्ही एक पाऊल उचलले आहे. अशी प्रतिक्रिया आमदार अमल महाडिक यांनी केले.

BJP MLA Amal Mahadik personally funding road patchwork in Kolhapur as opposition targets the ruling alliance over worsening road conditions ahead of municipal elections.
Ruturaj Patil vs Amal Mahadik : कोल्हापूर दक्षिणमध्ये 'अमल-ऋतूराज' मध्येच बिगफाईट; विकासाचा मुद्दा ठरणार निर्णायक

निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सध्याच्या परिस्थितीत भाजप सर्वाधिक प्रबळ आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील आपले राजकीय अस्तित्व पणाला लावून या निवडणुकीत उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप कासवाच्या गतीने महापालिकेच्या रणांगणात येत आहे. त्यामुळे सुरुवातीला काँग्रेसकडून भाजप (BJP) आणि शिवसेनेलाच रस्त्यांच्या मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याचा डाव टाकला जात आहे.

आमदार राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर चे तर आमदार अमल महाडिक हे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही उपनगरे शहरात येतात. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस (Congress) आक्रमक झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com