Maharashtra Karnataka Border Dispute : तब्बल ७२ तासानंतर महाराष्ट्र- कर्नाटक एसटी बस सेवा सुरू

Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकातील बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून हा प्रश्न वारंवार उकरुन काढण्याचा प्रयत्न केला जातोय.
Maharashtra Karnataka ST bus
Maharashtra Karnataka ST bus Sarkarnama

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाद पेटला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस सेवा गेल्या ७२ तासांहून अधिक काळापासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. मात्र,शुक्रवारी (दि.9) या एसटी बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Karnataka ST bus
Maharashtra-Karnataka : सीमाप्रश्न पेटला; सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

कर्नाटकातील बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून हा प्रश्न वारंवार उकरुन काढण्याचा प्रयत्न केला जातोय. यामुळे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करत महाराष्ट्र पासिंगच्या गाड्यांची तोडफोड केली जात होती. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस सेवा गेल्या ७२ तासांहून अधिक काळापासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, आजपासून या एसटी बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत

Maharashtra Karnataka ST bus
Vasant More Meets Amit Thackeray: वसंत मोरे अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

बेळगावमधून काही बस महाराष्ट्रात दाखल झाल्या असल्या तरी तणावाची स्थिती असल्याने या बसेस शहरात येत नाही.एसटी बससेवा बंद असल्याने त्याचा गैरफायदा खासगी वाहतुकदारांनी घेतला. प्रवाशांकडून दुप्पट दर घेऊन वाहतूक करत आहेत. कोल्हापूर ते कर्नाटकातील निपाणी साधारण ४० किलोमिटर अंतरासाठी प्रति सीट साधारण जिथे ४० रुपये दर आकारले जात होते, तिथे तब्बल २०० ते २५० रुपये दर घेतले जात आहेत. यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. प्रवाशांच्या प्रश्नाचा विचार करत प्रशासनाने कर्नाटक-महाराष्ट्र या दोन्ही विभागांमधून आज सकाळपासून बस सेवा पुन्हा सुरू केली आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र या दोन्ही परिवहन महामंडळांनी एकमेकांची बस सेवा चालू केली आहे. पोलीस प्रशासनाकडून आपल्याला सुरक्षितता आहे, याची खात्री झाल्यानंतरच ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र परिवहन महामंडळ, कोल्हापूर विभागाचे नियंत्रक अनघा वाघटक्के यांनी सांगितले. सकाळी बेळगाववरून कर्नाटकची बस पुण्याकडे रवाना झाली आहे. मात्र ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात न येता बायपासमार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com