Hasan Mushrif : महायुतीत मंत्री होताच मुश्रीफांचा कॉन्फिडन्स वाढला, आता म्हणतात, अजून दोनवेळा आमदार होणार

Political News : पुढच्या दोन टर्म आमदार होण्याची महत्वाकांक्षा मुश्रीफांनी बोलून दाखवली
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफांचा कॉन्फिडन्स आता चांगलाच वाढला आहे. यापूर्वी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. मधला एक वर्षाचा काळ ते मंत्रिमंडळाबाहेर राहिले होते.

मात्र, पाच महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत परत मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आता त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यामुळेच ते आता आणखी दोन टर्म तरी आमदार होणार, असा दावा करत आहेत.

तुमची राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होण्याची इच्छा आहे का ? असा प्रश्न केल्यानंतर यापूर्वी एक वेळा आमदार होणार असल्याची इच्छा बोलून दाखवणाऱ्या मुश्रीफांनी पुढच्या दोन टर्म आमदार होण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखवली. दोनवेळा आमदार होऊन जनतेची सेवा करायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेच्या सर्व जागा भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याची टिप्पणी केली. त्यावर बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड (jitrendra avhad) यांचा समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड हे शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये भांडण लावायचे काम करत आहेत, असा आरोप मुश्रीफांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hasan Mushrif
Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर व कॉन्ट्रॅक्टरमधील फरक कळत नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भुजबळांची भूमिका आहे. मंत्रिमंडळात आणि ओबीसीच्या सभेत देखील ते हीच मागणी करतात. जरांगेंच्या मागणी संदर्भात शासनाचं शिष्टमंडळ दुसऱ्यांदा त्यांच्याकडे गेलं होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासंदर्भात शासकीय अडचणीबाबत चर्चा झाली.

कोणाला आरक्षण मिळेल या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. त्या संदर्भात लवकरच तोडगा निघेल.अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर केली आहे. जरांगे-पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे कुणबी दाखले मराठ्यांना मिळाले आहेत. यामुळे दोघांनी हे प्रकरण जास्त न ताणता दोन्ही समाजाचे कसं भलं होईल हे पाहावं.

सरकारने सरसकट दाखला मिळणार म्हटले नाही. ज्यांचे कुणबी दाखले असतील निजाम काळापासून ते शोधून देण्यात येतील. शिंदे समितीच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. यामुळे सरकार फसवत आहे याचा प्रश्न येत नाही.

असे मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले. कालची चर्चा विस्कटली असेल तर आम्ही पुन्हा चर्चा करू. शासन आपले प्रयत्न सोडणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. असेही त्यांनी सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

कोल्हापुरातील धर्मवीर संभाजीराजे छत्रपती यांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्या प्रश्नासंदर्भात बोलताना मुश्रीफ यांनी, माझ्याकडे ओंकार शिंदे नावाचा तरुण आला होता. त्याची प्रामाणिकपणे इच्छा होती. त्याने विधान परिषदेच्या सदस्यांकडून निधी आणला. सोबतच महापालिकेकडून देखील निधी आणत प्रयत्न करून स्मारक केले.

छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे माझे दैवत आहेत. म्हणून मी ते आमंत्रण स्वीकारले. माझ्यावर आरोप होतील. मात्र ते अपूर्ण होतं की पूर्ण होतं हे माहीत नाही. मात्र, आम्हाला जी शिक्षा होईल ती आम्हाला मान्य असेल. अशा शब्दांत मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हिंदुत्ववादी संघटनांना उत्तर दिले आहे.

घाबरू नका, मास्क वापरा

गेल्या तीन आठवड्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. हा जास्त घातक नाही. मात्र सर्व शासकीय विद्यालयाच्या डीनसोबत बैठक झाली.नागरिकांनी घाबरण्याचे गरज नाही मात्र सावध राहावं. मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र सक्ती नाही. ज्यांना सर्दी झाली आहे. त्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

Hasan Mushrif
Hasan Mushrif : केवळ खरडपट्टी नको, हसन मुश्रीफांनी झारीतला शुक्राचार्य बाहेर काढावा !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com