A. Y. Patil : कोल्हापुरातील आणखी एक पाटील अजितदादांची साथ सोडणार; पाटलांची नेमकी कुठं चाललीय चाचपणी

A. Y. Patil preparing to go to Mahavikas Aghadi : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कोल्हापुरातून दुसरा धक्का बसला आहे. के. पी. पाटील यांच्यानंतर ए. वाय. पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी सुरू केली आहे. ए. वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
A. Y. Patil And K. P. Patil
A. Y. Patil And K. P. PatilSarkarnama

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे पक्ष विस्तारासाठी दौऱ्यावर असतानाच, पक्षाला दिग्गज नेते सोडचिठ्ठी देऊ लागलेत. माजी आमदार के. पी. पाटील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असतानाच, प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

ए. वाय. पाटील लवकर अजितदादांची साथ सोडणार असून, त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचा आदेश दिला. ए. वाय. पाटील महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षात चाचपणी करत आहेत, याची चर्चा रंगली आहे. ए. वाय. पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.

ए. वाय. पाटील यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळेल, असे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा जाला. या मेळाव्यातून ए. वाय. पाटील यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडीत जागा वाटाचा निर्णय व्हायचा आहे. तत्पूर्वीच ए. वाय. पाटील यांनी महाविकास आघाडीमधील काँग्रेसकडे (Congress) चाचपणी सुरू केली आहे.

A. Y. Patil And K. P. Patil
Bidri Sugar Factory : महाआघाडीच्या वाटेवर असलेल्या के. पी. पाटलांच्या बिद्री कारखान्यावर छापा

ए. वाय. पाटील काँग्रेसकडून इच्छुक असले, तरी त्यांचे मेहुणे माजी आमदार के. पी. पाटील यांनीही महाविकास आघाडीसाठी तयारी सुरू केली आहे. के. पी. पाटील यांनी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडे चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जाते. केपी आणि एवाय हे दोघेही पाटील काँग्रेसकडून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडी नेमकी कोणच्या बाजूने कौल देईल, याची आता उत्सुकता आहे. केपी आणि एवाय या दोघांची इच्छा काहीही असू देत, परंतु काँग्रेस नेते सतेज पाटील यांची उमेदवारी निवडीवर महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

A. Y. Patil And K. P. Patil
Praniti Shinde : आता भाजपचा त्रास सहन करायचा नाही; आता त्रास देण्याची वेळ : प्रणिती शिंदेंचे विधान

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणता मतदारसंघ कोणत्या बाजूने ही निश्चित व्हायचे आहे. जागा वाटपाची तयारी तिन्ही पक्षांकडून सुरू आहे. केपी आणि एवाय पाटलांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर करत आहेत. आबिटकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून कोणीतरी एक जणच असेल, असे सांगितले जात आहे. केपी आणि एवाय पाटलांमधील राजकीय वैरावरून कोण कोणाची डोकेदुखी वाढवणार, याचे चित्र निवडणुकीमध्येच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com