Bidri Sugar Factory : महाआघाडीच्या वाटेवर असलेल्या के. पी. पाटलांच्या बिद्री कारखान्यावर छापा

K. P. Patil : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने बिद्री कारखान्याची रात्रभर झडती घेतली. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
Bidri Sugar Factory-K. P. Patil
Bidri Sugar Factory-K. P. PatilSarkarnama

Kolhapur, 22 June : महायुतीला रामराम करत महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेले राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील अध्यक्ष असलेल्या दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक तपासणी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने बिद्री कारखान्याची रात्रभर झडती घेतली. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याचे (Bidri Sugar Factory) माजी आमदार के. पी. पाटील (KP Patil) हे अध्यक्ष आहेत. महायुतीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (Ajit Pawar Group) आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला झटका पाहून के. पी. पाटील यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

दरम्यान, बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने शुक्रवारी रात्रीपासून तपासणी केली. अचानक पडलेल्या छाप्यामुळे कारखाना प्रशासनामध्ये एकच धांदल उडाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिस्टलरी प्रकल्पाची तपासणी केली.

उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. ही तपासणी शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. प्रकल्पात असलेल्या त्रुटींबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून ही तपासणी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. त्याबाबतची कोणलाही कुणकूण लागली नव्हती. महायुतीत असलेले के. पी. पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच कारखान्यावर झालेल्या तपासणीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Bidri Sugar Factory-K. P. Patil
Ramdas Kadam : फडणवीससाहेब, तुमचा मंत्री माझ्या मुलाचं करिअर संपवतोय? रामदास कदमांची कोणाविषयी तक्रार

दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाही के. पी. पाटील सहभागी झाले होते. तसेच, खासदार शाहू महाराजांच्या आभार प्रदशर्नाच्या राधानगरी-भुदरगडमधील कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यामुळे पाटलांचा ओढा हा महाविकास आघाडीकडे असल्याचे दिसून येत होते.

राधानगरीचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे सध्या महायुतीच्या शिंदे गटाकडे आहेत. विद्यमान आमदार या नात्याने ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षाचा पर्याय असू शकतो, त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या वाटेवर असतानाच कारखान्यावर छापा पडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Bidri Sugar Factory-K. P. Patil
Udayanraje On Reservation : जातनिहाय जनगणना करा अन ज्याचा त्याचा वाटा देऊन टाका; आरक्षणावर उदयनराजेंची रोखठोक भूमिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com