Video Raju Shetti: 'समृद्धी'मुळे आमदाराचा रेट 50 कोटी; आता 'शक्तिपीठ' कुणासाठी? राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

Raju Shetti on CM Eknath Shinde Nagpur Goa Shaktipeeth Highway:शक्तिपीठ महामार्ग रद्द करू नका,आम्हाला योग्य मोबदला द्या, आमची जमीन अधिग्रहण करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Raju Shetti on CM Eknath Shinde
Raju Shetti on CM Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यान शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घेतले आहे. आता या महामार्गावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.

"मुख्यमंत्र्यांना रस्ते करायची सवय लागली आहे. समृद्धी महामार्गामुळे आमदाराचा रेट 50 कोटी निघाला आहे," अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

नांदेडच्या मालेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. शक्तिपीठ महामार्गासाठी कोणत्या भाविकांनी मागणी केली नाही. मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) याचे उत्तर द्यावं,असे शेट्टी म्हणाले.

एकीकडे शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे या महामार्गाच्या समर्थनार्थ वर्धा येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करू नका,आम्हाला योग्य मोबदला द्या आणि आमची जमीन अधिग्रहण करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Raju Shetti on CM Eknath Shinde
Sunil Kedar, Anil Deshmukh : अरे व्वा... केदार आणि देशमुखांनी करूनच दाखविले !

शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ यवतमाळसह अन्य जिल्ह्याचे शेतकरीसुद्धा आहे. फक्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अन् त्यांची जमीन अधिग्रहित करावी. या महामार्गामुळे अनेक फायदे होणार असून दळणवळण सोपी होणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गला सुद्धा विरोध करण्यात आला होता, आता शक्तिपीठलाही विरोध केला जात आहे. केवळ अधिग्रहनाची किंमत वाढविण्यासाठी आंदोलन केले जातं आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com