Sunil Kedar, Anil Deshmukh : अरे व्वा... केदार आणि देशमुखांनी करूनच दाखविले !

Development Funds Spent In Constituencies : नागपूर जिल्‍यातील 12 आमदारांनी खर्च केलेल्या विकास निधीची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये आमदार सुनील केदार आणि अनिल देशमुख हे दोघे आघाडीवर आहेत.
Sunil Kedar- Anil Deshmukh
Sunil Kedar- Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्रात सत्तेमध्ये असताना भाजपच्या आमदारांना जे जमले नाही, ते सावनेरचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री, काटोल-नरखेडचे आमदार अनिल देशमुख यांनी करून दाखवले.

नागपूर जिल्‍यातील 12 आमदारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात खर्च केलेल्या विकास निधीची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये केदार आणि देशमुख यांनी आघाडी घेत सत्ताधारी भाजपच्या आमदारांना मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे माजी मंत्री केदार हे मागील सहा महिन्यांपासून आमदार नाहीत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात त्यांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व देखील काढून घेण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने जवळपास वर्षेभर आपल्या ताब्यात ठेवले होते. मात्र या कारवाईचा कोणताही विपरित परिणाम या दोघांनी आपल्या मतदारसंघावर होऊ दिला नसल्याचे या आकडेवारीमधून समोर आले आहे.

Sunil Kedar- Anil Deshmukh
Video Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, 'दोन वर्षात एक लाख...'

आमदारांना दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला जातो.यापैकी त्यांनी सादर केलेल्या 3 कोटी 60 लाखांच्या विकास कामांच्या प्रस्तावाला राज्य शासनाचने मंजुरी दिली होती. हा सर्व निधी आतापर्यंत खर्चसुद्धा झाला आहे. राज्य शासनाने 2023-24 आर्थिक वर्षात सर्व आमदारांना पाच कोटींची निधी मंजूर केला होता. नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी फक्त 5 आमदारांना पूर्ण निधी खर्च केला आहे. यामध्ये अनिल देशमुख, टेकचंद सावरकर, विकास कुंभारे, मोहन मते, नितीन राऊत आणि कृष्णा खोपडे यांचा समावेश आहे.

Sunil Kedar- Anil Deshmukh
Mahayuti News : फोडाफोडीचा मोह आवरेना; आता सरपंच, सदस्यही महायुतीच्या रडारवर!

उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा 17 लाखांचा निधी अद्याप शिल्लक आहे. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचा 23 लाख, उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांचा 21 लाख, हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांचा 25 लाखांचा निधी अद्याप अखर्चित आहे.

पश्चिम नागपूरचे आमदार आणि लोकसभेची निवडणूक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना अवघड करणारे विकास ठाकरे यांचा 31 लाखांपेक्षा अधिक निधी अखर्चित आहे.राज्यात भाजपची सत्ता आहे. असे असताना भाजपच्या ज्या आमदारांना विकास निधी खर्च करण्यास जमले नाही, ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आजी आणि माजी आमदारांनी करून दाखविले अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com