Gautam Kakade: बारामतीतील निंबाळकर खून प्रकरणी फरार आरोपी गौतम काकडे याला अटक

Ranjit Nimbalkar Death Case Police Arrested Gautam Kakade: गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला होता.
gautam kakade | ranjit nimbalkar
gautam kakade | ranjit nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Baramati News: सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून बारामतीत झालेल्या गोळीबारात जखमी झालेले रणजित निंबाळकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. फरार असलेला मुख्य आरोपी गौतम काकडे याला पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार होता.

प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला होता. गौतम काकडे यांना अटक करा, यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता.

शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे बारामती तालुक्यातील झालेल्या गोळीबारामुळं खळबळ उडाली होती. रणजित निंबाळकर हे फलटण भागात पोलिस आणि सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते.

गेल्या दोन वर्षांपासून ते बैलगाडा शर्यतीत उतरले होते. निंबाळकर यांनी सुंदर बैलाची खरेदी माळशिरसमधून 21 लाख रुपयांना केली होती. निंबाळकर यांच्या मृत्यूमुळे बैलगाडा शर्यतप्रेमींना देखील धक्का बसला आहे.

gautam kakade | ranjit nimbalkar
Ram Satpute vs Praniti Shinde : ''इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर, तेरी जीत से ज्यादा चर्चे तो..'' ; राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला!

शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे आणि फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या 'सुंदर' नावाच्या बैलाचा देवाण-घेवाणीचा व्यवहार होता. निंबाळकर यांनी गौतम काकडे यांना 'सुंदर' नावाचा बैल 37 लाखांना विक्री केला होता. त्यातील 5 लाख दिले होते,

उर्वरित 32 लाख रुपये येणे बाकी होते. निंबाळकर हे गुरूवारी ( 27 ) आपली पत्नी अंकित आणि दोन मुलांसमवेत रात्री 11 च्या सुमारास निंबुत येथील गौमत काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. गौरवनं त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला होता, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com