राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना घेतेय तोंड फोडून; मुख्यमंत्र्यांचा चार्ज कोणाकडे तरी द्या...

संजय राऊत Sanjay Raut यांचे गोव्यात Goa जे काही चाललंय ते भाजपच्या BJP फायद्याचं असल्याचेही त्यांनी सांगितले.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबई बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. पण राज्यात इतके प्रश्न आहेत की त्यांचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना श्री. पाटील यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. त्यांची तब्येत बरी व्हावी, ही आमचीही इच्छा आहे. मात्र, राज्यात इतके प्रश्न आहेत की मुख्यमंत्र्यांचा चार्ज दुसऱ्या कोणाकडे तरी देण्याची गरज आहे. तो कोणाकडेही द्या आमचं काहीही म्हणणं नाही.

Chandrakant Patil
गोव्यात सेना-राष्ट्रवादी एकत्र - संजय राऊत; पाहा व्हिडीओ

संजय राऊत यांनी माझ्या आणि पक्षाच्या तब्येतीची काळजी करू नये, असा सल्ला देऊन चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षाचे वरिष्ठ काळजी करायला समर्थ आहेत. मुंबई बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळाले आहे. याविषयी विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या मागे लागून शिवसेना वारंवार तोंड फोडून घेत आहे, अशीही टीका त्यांनी केली. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी मतं लागतात याची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. पण, शिवसेना असे प्रयत्न का करते हेच कळत नाही. संजय राऊत यांचे गोव्यात जे काही चाललंय ते भाजपच्या फायद्याचं असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com