ShivSenaUBT And Congress party : 'मविआ' तुटणार? शिवसेना'UBT'चे उमेदवार 'AB'फॉर्म घेऊन गेलेत, तर काँग्रेसचे उमेदवार तयार

Shiv Sena UBT AB Forms Candidates: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत शिवसेना'UBT' पक्ष आणि काँग्रेस पक्षात जागा वाटपावरून मतभेद वाढले.
ShivSena UBT And Congress party
ShivSena UBT And Congress partySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election 2024 : महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे 'मविआ'चे भवितव्य टांगली लागलं आहे.

'मविआ'त बिघाडी होऊन तुटते की काय, अशी चर्चा असतानाच, शिवसेना'UBT'पक्षाचे उमेदवार 'AB'फॉर्म घेऊन गेले आहेत, तर काँग्रेसने देखील आपले उमेदवार तयार ठेवले आहेत. त्यामुळे अर्ज भरेपर्यंत नेमकं काय होईल, ते ज्योतिष देखील सांगू शकत नाही.

महाविकास आघाडीतील (MVA) शिवसेना'UBT'पक्ष आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर मोठ्या प्रमाणात मतभेद आहे. हे मतभेद अधिक वाढले असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून बोलणी देखील बंद झाली आहेत. त्यामुळे मविआचे भवितव्य अडचणी येऊ लागल्याची चर्चा आहे.

ShivSena UBT And Congress party
Shivsena UBT News : चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरूडमधून सेनेचा उमेदवार ठरला; 'हा' माजी आमदार निवडणूक रिंगणात

मुंबईतल्या चार ते पाच जागांवर शिवसेना'UBT' पक्षाने चर्चा न करता उमेदवार जाहीर केले आहे. उमेदवार जाहीर करून त्यांना 'AB; फॅार्म देखील देण्यात आले. यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) प्रचंड नाराजी पसरली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जागा वाटपावर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देखील नाराज आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नाराजीची चर्चा वेगळ्याच पातळीवर रंगली आहे.

ShivSena UBT And Congress party
Sangamner Politics Update : जयश्री थोरातांविषयी आक्षेपार्ह विधान; पसार वाचाळवीर वसंतराव देशमुख गजाआड

शिवसेना 'UBT' पक्षाने विचारात न घेता मुंबईत काही ठिकाणी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाना पटोले यावर वरिष्ठांशी चर्चा करत आहे. पक्ष नेतृत्वाशी देखील ते संपर्कात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सात ते आठ मतदार संघात चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेस याबाबत कधीही निर्णय घेऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना'UBT' पक्ष आणि काँग्रेसमध्ये दहा ते बारा जागांवर पहिल्यापासून मतभेद आहेत. हे मतभेद विकोपाला गेलेत. शिवसेना'UBT' पक्षाने चर्चा न करताच परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी देखील नाराज झाले आहेत. यामुळे काँग्रेसने दहा ते बारा जागांवर उमेदवार ठेवले तयार ठेवले असून, काँग्रेसही आपल्या उमेदवारांना AB फार्म देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com