Raju Waghmare
Raju Waghmaresarkarnama

भाजप शंभर जागांच्या पुढे जाणार नाही : राजू वाघमारे

आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. (2 years of MVA survey)
Published on

मुंबई : ''निवडणुकीआधी ५५ नेत्यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी २० ते ४० आमदार पुन्हा येणार असतील तर चित्र बदलले दिसेल, पण नोटाबंदी, पुलवामा, कोरोना यांचा परिणाम झालेला दिसून येईल. आताची परिस्थिती पाहता भाजप 100 जागांच्या पुढे जाणार नाही. कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या जागा वाढतील,'' असे मत प्रदेश काँग्रेसचे सरचटणीस व प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या (2 years of MVA survey) कामगिरीवर आधारित सकाळ व साम टिव्हीने केलेल्या सर्वेक्षणात देखील राज्यात आज निवडणुका झाल्या तर जनतेची पहिली पसंती ही महाविकास आघाडीलाच असणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीला(Maha Vikas Aghadi) सत्तेत येऊन दोन वर्षे (Maha Vikas Aghadi government's 2 years)झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. त्या कार्यक्रमात राजू वाघमारे (Raju Waghmare) बोलत होते.

राजू वाघमारे म्हणाले, ''ज्या 31 टक्के लोकांना सत्ता स्थापनेसाठी झालेली आघाडी खटकली आहे त्यात शिवसेना, काँग्रेसचे मतदार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे राजकारण हे लोकांना मान्य आहे. निकालानंतर हा प्रयोग होणार याच्याविषयी भाष्य मी केले होत. निवडणूक निकालापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रयोगावर भाष्य केलं होतं,''

Raju Waghmare
अनिल परबांचा इशारा ; 'नो वर्क नो पे' करणार, कारवाईला भाग पाडू नका!

''आर्थिक संकटात असताना राज्य सरकारनं मदतीची भूमिका घेतली. सर्व्हे करण्यात आले आहे. प्रश्न असा आहे की, आता शेतकऱ्यांना आता जी मदत ही तुटपूंजी. आपण आता कोरोनातून बाहेर पडतो आहे. त्यामुळे राज्याची स्थिती पुन्हा एकदा सुधारल्याशिवाय राहणार नाही,'' असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्या, आमदार श्वेता महाले म्हणाल्या, ''लखीमपूरची घटना ही नक्कीच दुर्देवी आहे. मला हे सांगायचे आहे की, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची काळजी सरकारला नाही. सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत आली असती. तालिबानी पद्धतीनं शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांचे काही एक पडलेले नाही,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com