Rupali Chakankar News : तीन महिन्यांत 3 हजार 594 अधिक तरुणी बेपत्ता; महिला आयोग आक्रमक; राज्य सरकारला 'ही' सूचना....

Maharashtra Politics: ''राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं..'''
Rupali Chakankar News
Rupali Chakankar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील तीन महिन्यांत महाराष्ट्रातून 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारचे चांगलेच धाबे दणाणले आहे. मुलींच्या बेपत्ता होण्यावरुन आता राज्य महिला आयोग आक्रमक झालं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुली बेपत्ता होण्याच्या धक्कादायक आकडेवारीवरुन शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं असं चाकणकरांनी म्हटलं आहे. तसेच वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक असल्याचं नमूद केलं.

Rupali Chakankar News
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाचा नवा अंक; ठाकरे गटाचं दबावतंत्र तर शिंदेंचीही कायदेशीर चाचपणी!

राज्य सरकार(Shinde Fadnavis Government)च्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, मात्र या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही. पण राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी अशी विनंती आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या.

याचवेळी त्यांनी महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहिम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाने(Maharashtra state Commission For Women) गृह विभागाला केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली

Rupali Chakankar News
Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

चाकणकर काय म्हणाल्या?

राज्यात 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान 3 हजार 594 महिला बेपत्ता आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब असल्याचं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करुन त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com