Sharad Pawar News: मोठी बातमी: 'गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद...'; शरद पवारांनी केलं सरकारचं टेन्शन वाढवणारं ट्विट

Chakan MIDC : राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी(ता.१३) सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक अतिशय मुद्दा अधोरेखित कऱणारी पोस्ट केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमधील तब्बल २० लघुउद्योग व मध्यम कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या कंपन्यांनी चाकण एमआयडीसीमधील खराब रस्ते, मोठी वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या अभाव यामुळे त्रस्त होऊन हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट ओढावलं आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.

राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी(ता.१३) सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर एक अतिशय मुद्दा अधोरेखित कऱणारी पोस्ट केली आहे. पवारांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचं ट्विटमध्ये नमूद केलं आहे. तसेच या कंपन्यांमध्ये सुमारे २००० हून अधिक कामगार कार्यरत असल्याचंही म्हटलं.

पवार त्यांच्या ट्विटमध्ये हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

पवारांनी ट्विटमधून सरकारला दिलेले सल्ले:

• चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.

• खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी.

• MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.

• उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी.

Sharad Pawar
Ghodganga Sugar Factory: शिरूरचा ‘घोडगंगा’ पुन्हा सुरू होणार? सुनेत्रा पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश, अशोकबापूंना 'साईडलाईन'करुन माऊलीआबा अ‍ॅक्शन मोडमध्ये

तसंच, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार श्री. राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या असल्याचं शरद पवारांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

मात्र, या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक असल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar
Shivsena Vs BJP: 'मी भोळा राहिलो, तर भाजपवाले मला खाऊन जातील...”; एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्यानं महायुतीत उडवून दिली खळबळ

महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नसल्याची सांगत सरकारचे एकप्रकारे पवारांनी कानही टोचले आहेत.

सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही, असंही शरद पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com