बाळासाहेब असते तर हिंदुत्ववाद्यांचे मुखवटे ओरबडून निघाले असते..

''महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे धोरण होते.
Balasaheb Thakray
Balasaheb Thakraysarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आज ९ वे पुण्यस्मरण. यानिमित्तान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चा अग्रलेखातून 'बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय केलं असतं,' याबाबत भाष्य केलं आहे.

''महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. मातृभूमीला वंदन करणारा, प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रुप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर लेक्चर देतात. तेव्हा लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवेच होते,'' असे अग्रलेखात म्हटलं आहे.

भारताला स्वातंत्र्य हे भीकेत मिळालं असं बेताल व्यक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिन नुकतच केले आहे. कंगनाच्या विधानाचा समाचार अग्रलेखातून घेण्यात आला आहे. आहेत. ''लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते,'' असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

Balasaheb Thakray
दहावी पास युवकांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून गुड न्यूज

'स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खऱे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे,'' अशा शब्दात कंगनाचे समर्थन करणारे अभिनेते विक्रम गोखले अन् गायक अवधूत गुप्ते यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  • त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलन केली. त्या आंदोलनामुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या.

  • या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला.

  • रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही.

  • त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली.

  • बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची बंदची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com