Kiren Rijiju News : दौलताबाद किल्ल्यावर बाबासाहेबांचा अपमान झाला त्याच ठिकाणी स्मारक उभारणार!

A memorial will be erected at the same place where Babasaheb Ambedkar was insulted : हा संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पुस्तकांमध्ये देखील असल्याचा दावा रिजिजू यांनी केला. मुस्लिम व्यक्तीने हिणवल्यानंतर बाबासाहेबांनी `तुम्ही मुस्लिम आहात ना, मग रमजान मध्ये अस्पृश्य म्हणुन अपमान का करताय`, असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
Kiren Rijiju
Kiren RijijuSarkarnama
Published on
Updated on

BJP Political News: अस्पृश्यता हा देशाला जडलेला रोग आहे, तो पारसी, ईसाईप्रमाणेच व इतर धर्मीयांप्रमाणेच मुस्लिम धर्मामध्येही पहायला मिळतो, असा दावा करत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी दौलताबाद किल्ल्यावर एका मुस्लिम व्यक्तीने 1935 मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा कसा अपमान केला होता? याचा दाखला दिला. पुरात्व विभागाशी बोलून ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अपमनाची घटना घडली, त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर असलेल्या मंत्री रिजिजू यांच्या या जुना वाद उकरून काढण्यावरून गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुक महिनाभरावर आलेली असताना केंद्रातील एका जबाबदार मंत्र्यांने जुन्या घटनेचा नव्याने उल्लेख करण्यामागे नेमका काय हेतू? असावा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थीत केला जात आहे.

पत्रकारांशी संवाद साधतांना किरेन रिजिजू यांनी मुस्लिम व्यक्तीकडून दौलताबाद किल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कशी हिन वागणूक दिली होती, याचा संदर्भ सांगितला. शहरापासुन जवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्यावर एका मुस्लिम व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना `अस्पृश्य` म्हणुन हिणवले होते.

बाबासाहेब 1935 मध्ये दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह आले होते. येथे आल्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने त्यांना `अस्पृश्य` म्हणुन हिणवले आणि तेथील प्रार्थना स्थळाच्या हौदाजवळ येण्यापासून रोखले होते.

Kiren Rijiju
Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : लोकसभेला माघार, आता नाही ; पाच मतदारसंघावर दावा सांगत भाजप आक्रमक..

हा संदर्भ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पुस्तकांमध्ये देखील असल्याचा दावा रिजिजू (Kiren Rijiju)यांनी केला. मुस्लिम व्यक्तीने हिणवल्यानंतर बाबासाहेबांनी `तुम्ही मुस्लिम आहात ना, मग रमजान मध्ये अस्पृश्य म्हणुन अपमान का करताय`, असे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांनी एकले नाही, त्यानंतर बंदोबस्तात बाबासाहेबांनी दौलताबाद किल्ला पाहिला होता. हिंदु समाजातील अस्पृश्यता हा `आजार` पारसी, इसाई पाठोपाठ मुस्लिम समाजातही असल्याचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात केल्याचा दावा मंत्री किरेन रिजिजू यांनी केला.

मात्र कोणत्या पुस्तकात हा उल्लेख आहे, हे मात्र ते सांगू शकले नाही. विशेष म्हणजे 1935 मध्ये घडलेल्या या प्रकारावर आता दौलताबाद किल्ल्यावरील ते नेमके ठिकाण पुरातत्व विभागाच्या मदतीने शोधून तिथेच बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

Kiren Rijiju
Kiren Rijiju News : ''..तर आमची सत्ता येईल, त्यानंतरच 'त्यांना' सत्तेत वाटा मिळेल'' ; रिजिजू यांचं पुण्यात वक्तव्य!

याशिवाय छावणी परिसरातील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या बंगल्याला (स्मारक) व बौद्ध लेणी परिसराला निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कॉंग्रेसने बाबासाहेबांना त्रास दिला असे मंत्री रिजिजु म्हणाले. यावर आता या गोष्टी सांगण्या पेक्षा, तुम्ही दहा वर्षात काय केले ? असे विचारल्यावर विषयांतर करीत त्यांनी बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com