Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : लोकसभेला माघार, आता नाही ; पाच मतदारसंघावर दावा सांगत भाजप आक्रमक..

BJP claims five constituencies : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवली आहे. जिल्ह्यातील नऊ पैकी किमान पाच विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार असावेत, यासाठी आतापासून प्रयत्न सुरू झाले आहेत.
Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Shivsena-Bjp-Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Mahayuati Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाचे जागावाटप कसे होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपने दावा सांगत तब्बल दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती.

मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) ची जागा आमचीच, असे म्हणत आग्रह कायम ठेवला आणि दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळत ही जागा शिवसेनेला सोडली. दोन वर्ष गाव पातळीपर्यंत काम करूनही जागा शिवसेनेला सोडावी लागली याचे शल्य जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवली आहे. जिल्ह्यातील नऊ पैकी किमान पाच विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार असावेत, यासाठी आतापासून प्रयत्न सुरू झाले आहेत. सद्य परिस्थिती जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे पाच आमदार आहेत, तर कन्नड विधानसभा मतदारसंघात एकमेव उद्धव ठाकरे गटाचा आमदार आहे.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Assembly Election 2024 : आजघडीला निवडणुका झाल्यातर महायुती की 'मविआ', कोण ठरणार वरचढ? मोठा ओपिनियन पोल समोर

त्यामुळे साहजिकच शिंदे यांची शिवसेना आहे त्या जागांसह कन्नड विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार आहे. तसेच झाले तर शिवसेना शिंदे गटच नऊ पैकी सहा विधानसभेच्या जागा लढवण्याच्या तयारीत आहे. अशावेळी भाजप (BJP) पाच जागा कशा मिळवणार? हा खरा प्रश्न आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही जिल्ह्यात किमान दोन विधानसभा मतदारसंघात लढू पाहत आहे. त्यामुळे मतदार संघात जागा नऊ आणि दावेदारी तेरा जागांसाठी अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशावेळी महायुतीतील नेते कसा मार्ग काढणार? यावर जिल्ह्यातील जागावाटप आणि त्यानंतर महायुतीचे यश अवलंबून असणार आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी ग्रामीण मधील कन्नड ची जागा महायुतीत भाजपासाठी सोडा, अशी मागणी केली आहे. याशिवाय शहरातील पूर्वसह पश्चिम किंवा मध्य पैकी एक जागा भाजपाला दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
BJP and Vidhan Sabha Election: 'भाजपच ठरणार मोठा पक्ष' ; 'या' सर्व्हेने वाढवली महाविकास आघाडीची धाकधूक

लोकसभा निवडणुकीत भाजपने माघार घेत संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाला दिली. एवढेच नाही तर खासदार संदिपान भुमरे यांना निवडून आणण्यात भाजपचा सिंहाचा वाटा होता, असा दावा करत आता विधानसभेला भाजपला झुकते माप द्या, अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मात्र जिल्ह्यात सध्या आमचे पाच आमदार आहेत शिवाय कन्नड विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत.

त्यामुळे सहा मतदार संघात आमचे उमेदवार असतील. स्थानिक पातळीवर नेत्यांनी इच्छा व्यक्त करणे यात काही गैर नाही. परंतु यावरून महायुतीत कुठलाही वाद निर्माण होणार नाही आणि जागावाटप कसे करायचे? याचा अंतिम निर्णय राज्यातील महायुतीचे मोठे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील असे स्पष्ट केले. तुर्तास शिवसेना विधानसभा मतदारसंघांच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com