Bhaskar Jadhav Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण? आदित्य ठाकरेंची काय आहे भूमिका? भास्कर जाधव म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांची पाप...'

Bhaskar Jadhav Reacts to Aaditya Thackeray Stand on Opposition Leader Post : राज्यातील विरोधी पक्षनेतेपदावर आदित्य ठाकरेंची नेमकी कोणती भूमिका आहे, यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Bhaskar Jadhav Opposition Leader
Bhaskar Jadhav Opposition LeaderSarkarnama
Published on
Updated on

Opposition leader controversy : राज्याच्या विरोधी पक्षनेता पदाचा निर्णय अजून झालेला नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, याबाबत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती.

यानंतर आदित्य ठाकरे यांचे नाव देखील विरोधी पक्षनेता पदाच्या चर्चेत आले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, "महायुती (Mahayuti) सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान त्यांना मान्य नाही. लोकशाहीवर विश्वास नसलेल्या सत्ताधाऱ्यांना, सरकारमध्ये विरोधी पक्षनेता देखील तेवढाच महत्त्वाचा असतो, याचा विसर पडला आहे. सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधी पक्ष देखील मजबूत असायला हवा." विरोधी पक्षनेते मजबूत नसल्याने, सत्ताधारी मस्तीमध्ये आहे, अंहकारमध्ये वावरतात आहे, हे कालच्या अधिवेशनात लक्षात आलं आहे, असा टोलाही आमदार जाधव यांनी लगावला.

'विरोधी पक्षनेते न निवडण्याचं कारण म्हणजे, सरकार मोठ्या संख्येने आहे. आमदारांची संख्या मोठी आहे, तशीच त्यांची पाप देखील मोठी आहेत. यातच विरोधी पक्षनेता खंबीर अन् खमक्या भेटला, तर आपली पाप बाहेर काढेल. त्यामुळे यांना विरोधी पक्षनेता निवडायचा नाही. विरोधी पक्षनेता आल्यास सत्ताधारी 100 टक्के घाबरतील. लोकशाहीला देखील अपेक्षित आहेत, सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्याला घाबरायलाच पाहिजे. अन् विरोधकांना सत्ताधारी घाबरत आहे, हे देखील तेवढंच सत्य आहे,' असेही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले.

Bhaskar Jadhav Opposition Leader
Devendra Fadnavis Politics: भाजपने महापालिका निवडणुकीचा कारभारी बदलला; नाशिकच्या भाजपमध्ये 'ऑल इज नॉट वेल'

आदित्य ठाकरेंचे नाव विरोधी पक्षनेतेसाठी येत आहे, यावर बोलताना आमदार जाधव म्हणाले, "आदित्य ठाकरे यांनीच माझं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी सांगितलं आहे. उमेदवार भास्कर जाधवच असेल, असे स्पष्ट केले असताना, सत्ताधाऱ्यांकडून आदित्या ठाकरेंच्या नावाच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण केला जात आहे. चिडवण्याकरता, संभ्रम निर्माण करण्यासाठी, या बातम्या सोडलेल्या जातात. सत्ताधारी असंही राजकारण करतात, याचा प्रत्यय आहे. पण त्यात तथ्य नाही."

Bhaskar Jadhav Opposition Leader
Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष अन् एमडीमध्ये शीतयुध्द! अध्यक्षांनी केले गंभीर आरोप

दरम्यान, भास्कर जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार मांडला. काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांना बरोबर घेणार आहे. काही जागांवर चर्चा झाली आहे. पण अंतिम स्वरूप आलेलं नाही. जागा वाटपाबाबत लवकरच तोडगा निघेल, असे सांगितले. तसंच चिपळूण नगरपरिषदेमध्ये ज्यांना मी पाठिंबा दिलाय, त्या रमेश कदम यांचा विजयी होतील, तसंच बहुसंख्य नगरसेवक देखील आमचेच निवडून येतील, असा दावा देखील केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com