Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष अन् एमडीमध्ये शीतयुध्द! अध्यक्षांनी केले गंभीर आरोप

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि एमडी यांच्यामध्ये सध्या अंतर्गत वाद सुरु असल्याचं अध्यक्षांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवरुन दिसून येत आहे.
Annasaheb Patil Mahamandal.jpg
Annasaheb Patil Mahamandal.jpgSarkarnama
Published on
Updated on

कराड : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि एमडी यांच्यात सध्या अंतर्गत वाद सुरु असल्याचं अध्यक्षांनी दिलेल्या प्रतिक्रीयेवरुन दिसून येत आहे. मराठा समाजातील तरुण उद्योजक होऊ नयेत याची सुपारी वाजवण्याचे काम महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख करत आहेत असा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्यावेळी हे वातावरण चिघळू लागले त्यावेळी एमडींनी एलवाय देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यासाठी जाचक अटी टाकल्या असून ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण कोणत्याच योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही असं कारस्थान त्यांनी रचलं असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Annasaheb Patil Mahamandal.jpg
VBA Kolhapur: 'वंचित' कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात; प्रस्थापितांच्या अडचणीत वाढ

मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची रचना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यात आत्तापर्यंत एक लाखांवर उद्योजक निर्माण कण्यात यश आले आहे. आता पाच लाख उद्योजक करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याचे सांगून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, "आण्णासाहेब पाटील महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख मराठा समाजासाठी काहीतरी चांगले काम करतील असे वाटले होते. मात्र, त्यांनी ९ ऑक्टोंबर २०२५ पासून महामंडळाच्या कर्ज प्रकरणांना मंजूरी देणे बंद केले. त्यांना जाणीवपूर्ण महामंडळाचे लाभार्थी वाढू नयेत, मराठा समाजातील तरुण उद्योजक होऊ नयेत याची सुपारी वाजवण्याचे काम दिलेले आहे. ज्यावेळी वातावरण चिघळू लागले, तक्रारी होऊ लागल्या त्यावेळी त्यांनी एलवाय देण्यासाठी सुरुवात केली. मात्र, त्यासाठी जाचक अटी टाकल्या असून ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण कोणत्याच योजनेचा लाभार्थी होऊ शकत नाही असे कारस्थान त्यांनी रचले आहे"

Annasaheb Patil Mahamandal.jpg
गरिबी होणार नष्ट, पैशांचीही गरज राहणार नाही; इलॉन मस्कनं सांगितलं कारण

पाटील पुढे म्हणाले, "एखाद्या एमडीला निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी अध्यक्षला अगोदर सांगणे गरजेचे आहे. अध्यक्षांच्या संमत्तीनंतर महामंडळाच्या बोर्ड मिटींगमध्ये त्या निर्णयाला मंजूरी देणे आवश्यक असते. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी ट्रॅक्टर योजना बंद केली. पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तो प्रस्ताव मांडला. त्यावेळी मुख्यंमत्री शिंदे व देंवंद्र फडणवीस यांनी त्याला संमत्ती दिली. त्यासाठी मी सर्वप्रथम बोर्ड मिटींगमध्ये याची चर्चा केली. देवरा एमडी असताना त्यांच्या सुचनेप्रमाणे मराठा समाजाला ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरु करण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला. दुसऱ्या मिटिंगला मिनीट मंजूर झाले आणि तिसऱ्या मिटिंगला या योजनेला मंजुरी मिळाली. त्यावेळपासून कमी दरात लाभार्थींना देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली ही एक प्रक्रीया असते. मात्र सध्याचे एमडी देशमुख हे कोणतीही प्रक्रीया पाळत नाही, मनमानी कारभार करत आहेत. आपल्या समाजातील माणूस ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या विरोधात उठला आहे.

Annasaheb Patil Mahamandal.jpg
Ravindra Dhangekar: महायुतीच्या बैठकीत धंगेकरांना नो एन्ट्री! शिवतरेंनी स्पष्टच सांगितलं

विखेंकडूनही कान उघडणी

महामंडळाच्या कार्यपध्दतीबाबत मागच्या काही महिन्यात खासदार, आमदार यांच्याकडून तक्रारी येत होत्या. नागपूर अधिवेशनादरम्यान आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्राला, मराठा समाजाच्या पत्राला अनुसरुन मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला मी, आमदार निरंजन डावखरे उपस्थित होतो असे सांगून महामंडळाचे अध्यक्ष पाटील म्हणाले, "मंत्री विखे-पाटील, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनी एमडी देशमुख यांना तुम्ही स्वतःचा मनमानी कारभार करत आहेत हे चुकीचं आहे. तुम्ही मूळ मराठा असूनही मराठा समाजाच्या योजनेमध्ये अडथळे निर्माण करत आहात, तुम्ही संचालकांची बैठक घेऊन चर्चा करा. अध्यक्षांना विश्वासात घेऊन चूकीचे काम केले आहे ते सुधारा आणि संचालक मडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवा अशा सूचना दिल्या आहेत. अशा सुचना देऊनही त्यात काहीही बदल झालेला नाही"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com