Maharashtra News Live Update : बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्त्रीचं 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या श्याम मानव यांना थेट आव्हान

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 29 April : विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ५ नावांची घोषणा; प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी, यासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घेऊ या.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

बागेश्वरधामच्या धीरेंद्रशास्त्रीचं 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या श्याम मानव यांना थेट आव्हान

नागपूरमधून बागेश्वरधामचे धीरेंद्रशास्त्री यांनी थेट 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे श्याम मानव यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी प्रदेश तुमचा आहे आणि मंचही तुमचाच आहे. ज्यांना काही खाज असेल त्यांनी माझ्या दरबारात यावं. ते स्वतः कोणाकडेही जाणार नसून, ते नागपुरात दोन दिवस दरबार लावणार आहेत आणि तिथेच सादरीकरण करतील, असं चॅलेंज दिलं आहे. तर बाबांकडे कोणतीही दैवीशक्ती नसून ते केवळ लोकांना फसवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप श्याम मानव यांनी केला आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले,'उद्धवजींनी सभागृहात जावं...'

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धवजींनी सभागृहात जावं, अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला वाटतं. मी उद्धव ठाकरे, पक्षाचा तसेच शिवसेना प्रमुखांच्या विचारानं चालण्याचा संकल्प केला, त्याच विचारांचा हा विजय असल्याचं दानवेंनी म्हटलं आहे.

यवतमाळात नारीशक्ती वंदन कायद्याच्या समर्थनात भाजपचा मोर्चा

नारीशक्ती वंदन कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या धोरणांचा यवतमाळ मध्ये तीव्र निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, महिला आघाडीच्या वतीने शहरातील दत्त चौकात निदर्शने करण्यात आली. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी करीत भाजपाच्या महिलांनी जनआक्रोश आंदोलन’ केले. लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक विरोधकांनी खारीज करून समस्त महिलांचा उपमान केल्याचा आरोप भाजपच्या महिलांनी केला.

विधान परिषदेवर पुन्हा संधी नाही, संजय केनेकर यांचे जळजळीत स्टेट्‍स अन्...

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 12 मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. यात मराठवाड्यातून संजय केनेकर, कैलास गोरंट्याल, अर्चना पाटील चाकूरकर, सुरेश बनकर, जयदत्त क्षीरसागर अशा नावांची चर्चा होती. पण पक्षाने या नावांवर फुली मारत प्रज्ञा सावंत यांना संधी दिली. ज्यानंतर आता संजय केनेकर यांनी आपल्या व्हाॅट्सअप स्टेटसवर केलेल्या जळजळीत कवितांच्या ओळींच्या उल्लेखाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागली आहे.

पालकांनी सावधान राहावं किरीट सोमय्यांचं बुलढाण्यात आवाहन...

राज्यात अनेक भागात लव जिहादच्या घटना घडत आहेत कोल्हापूर असू देत नाशिक असू देत किंवा अमरावती अशा ठिकाणी घडलेल्या घटनेत काही मुस्लिम तरुण गोरे - गोमटे बनून हिंदूंची नाव धारण करून हिंदू मुलींना फसवत आहेत. त्यामुळे राज्यातील पालकांनी सतर्क व सावधानता बाळगावी अस आवाहन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाण्यात केलं

तटकरेंना श्रीवर्धन मधून हद्दपार करणार, राष्ट्रवादीचा परतीचा प्रवास सुरू झालाय : शिवसेना जिल्हाप्रमुखाची खरमरीत टीका

रायगडमधील दिवेआगर ग्रामपंचायत निकालानंतर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट टीकेचे लक्ष केलं आहे. दिवेआगर ग्रामपंचायतचे शिवसेना पुरस्कृत नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचलेले घोसाळकर यांनी तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. सुनील तटकरे यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय असा इशारा देत तटकरे यांना हद्दपार करून पुन्हा एकदा श्रीवर्धन मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास घोसाळकर यांनी व्यक्त केला.

बुलढाण्याच्या तपमानात वाढ होऊन तापमान पोहचले 43 डिग्रीच्या वर. ..

बुलढाणा चे तापमानात मोठी वाढ होऊन 43 डिग्री चे वर तापमान पोहचेल आहे . त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होताना दिसत आहे. तर नागरिकांनी थंड हवा मिळावी म्हणून आपल्या घरातील कुलर काढले असून त्याच्या जाळी दुरुस्ती करताना दिसत आहेत.

निजामपूर पोलिसांची धडक कारवाई; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी गोव्यातून तिघांना अटक

साक्री तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना निजामपूर पोलिसांनी थेट गोव्यातून बेड्या ठोकल्या आहेत. 20 एप्रिल रोजी या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गोव्यातील कलंगुट आणि बागा बीच परिसरात शोध मोहीम राबवली. या कारवाईत पोलिसांनी पीडितेची सुरक्षित सुटका करत मुख्य संशयित आरोपी सह त्याच्या दोघा साथीदारांच्या निजामपूर पोलिसांनी मूसक्या आवळल्या.

MLC News : विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ठरणार निर्णायक

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच दिल्लीत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे एबी फॉर्म घेऊन दिल्लीहून मुंबईकडे निघाले असल्याचे स्पष्ट होत आहे.

Pune Bjp : पुण्यातील भाजपची डोकेदुखी वाढणार

भाजपच्या पुणे महानगरपालिकतील दोन महिला नगरसेविकेतील वाद पाहायला मिळाला. त्यानंतर वरिष्ठांनी यामध्ये दखल घेत दोन्हीही महिला नेत्यांची समेट घडून आली होती. मात्र त्यानंतर भाजपमधील दोन महिला नगरसेविका आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहचला असून त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Congress : काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले सर्वांचे लक्ष

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाकडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस ट्विस्ट आणणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ थेट दिल्लीत पोहचले असून त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र माझा... मराठी माझी बोली भाषा...! पुस्तिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत मुंबईत खासगी वाहन चालकांसाठीच्या मराठी पुस्तिकेचे प्रकाशन केले. परिवहन विभागामार्फत 'महाराष्ट्र माझा... मराठी माझी बोली भाषा...! सौजन्यशील सेवा... प्रवाशांच्या मनात विश्वासाची आशा..!' ही मार्गदर्शिकेा तयार करण्यात आली आहे.

Ambadas Danve news : अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार

अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

MLC Election news : अंबादास दानवे यांना उमेदवारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून उद्धव ठाकरे यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता.

West Bengal election : ईव्हीएम मशीनवरील कमळ चिन्हावर चिकटपट्टी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. फालता मतदानरसंघात एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनवर भाजप उमेदवाराच्या नावासमोरील कमळ चिन्हावर चिकटपट्टी लावण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने या केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश काढले आहे. जिथे असे प्रकार घडतील, तिथे पुन्हा मतदान घेतले जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अतिक्रमण हटवताना संभाजीनगरात तणाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान तणाव निर्माण झाला. सेव्हन हिल पूल ते भाजीवाली बाई चौक या भागात सकाळपासून मोहीम सुरू करण्यात आली. या वेळी स्थानिक नागरिक, दुकानदार आणि मालमत्ता धारकांनी कारवाईला तीव्र विरोध केला, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

रुपाली चाकणकरांना मोठा धक्का; सरपंच निवडणुकीत भावाचा पराभव

राज्यातील ग्रामपंचायत सरपंच निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून काही ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. चाकणकर यांच्या सख्ख्या भावालाही पराभव पत्करावा लागला. हा निकाल त्यांच्या कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Raigad Politics : रायगडच्या दिवेआगारमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार तटकरे यांना धक्का

रायगडमध्ये 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल समोर येत असून, श्रीवर्धनमधील दिवेआगार ग्रामपंचायत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. दिवे आगारमध्ये अजित पवार राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून दिवेआगार विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदावर जिंकून आले आहेत. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. काही दिवसापूर्वी म्हसळा नगर पंचायतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचा मोठा धक्का बसला होता. आता दिवेआगार हि महत्वाची ग्राम पंचायत राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे.

Jalgaon Accident : भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर टायर फुटल्याने चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. वाहनातील तीन जणांचा मृत्यू झाला असून, यात नुकतच लग्न झालेल्या नववधूचा देखील समावेश आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून, एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.

Mumbai Politics : नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी रूचिता घोरपडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत पार पडलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या महासंघात राज्यातील 393 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत. महत्त्वाचं म्हणजे महासंघाच्या कार्यकारणी समितीत अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड करण्यात आलीय.

Beed Politics : मस्साजोग सरपंच निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मस्साजोग गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीचे राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांचा पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी त्यांचा 92 मतांनी पराभव केला आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरात महिलांना देत असलेल्या गुंगीकारक औषधाचे रहस्य उलगडेना.....

भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडितांना दिल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधाचा तपास लावण्यात एसआयटीला अद्यापही यश आले नसून हे औषध कोणते? ते खरात कुठून मागवत होता, याबद्दल गूढ कायम आहे. नाशिकमधील भोंदू खरातविषयी अनेक पीडितांनी शारीरिक शोषणाच्या तक्रारी केल्या. एसआयटीने हे गुंगीकारक औषध शोधण्यासाठी नाशिक शहरातील दोन डॉक्टरांची चौकशीही केली होती.

Heat wave : "उष्णतेच्या लाटा, आता मानवाधिकाराचा प्रश्न!"

भारतात उष्माघातामुळे वाढणारे मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 21 राज्ये आणि दिल्ली सरकारला आपत्कालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. 2019 ते 2023 दरम्यान उष्माघातामुळे 3,712 हून अधिक लोकांचा बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी आयोगाने समोर ठेवली आहे.

Petrol Diesel More Expensive : देशातील विधानसभा निवडणुका संपल्या; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा झटका बसणार

युद्धामुळे महाग झालेल्या कच्च्या तेलामुळे आणि डॉलर महागल्याने आता विधानसभा निवडणुका होताच भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किमान 5 रुपयांनी वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या भारताला महाग कच्चे तेल आयात करावे लागत आहे. इतर देशांनी महाग कच्च्या तेलामुळे आधीच पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. भारतात पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे ही दरवाढ थांबवण्यात आली होती, अशी चर्चा होती. आता 29 तारखेला बंगालमध्ये मतदान आहे. त्यानंतर 4 मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्या दरम्यान पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी मुंबईतील शेअर केला अनुभव; 22 मिनिटं टॅक्सी ओला उबेर मिळाली नाही.....

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रभादेवी या ठिकाणी आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी 22 मिनिटं त्यांना ओला उबेर आणि टॅक्सी मिळाली नाही. अनेक टॅक्सीना हाक मारली. मात्र काही टॅक्सीवाल्याने त्यांना गाडी थांबवली नाही. त्यामुळे रियालिटी चेक या व्हिडिओमधून त्यांनी केली आहे. सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 22 मिनिटं मला उभे राहावे लागले. मात्र टॅक्सी आणि ओला उबेर मिळाली नाही. काही टॅक्सी, ओला, उबेर असताना सुद्धा त्यांनी मला घेतले नाही, अशा प्रकारचा अनुभव त्यांनी सोशल मीडियात शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे सांगितला आहे.

नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाची स्थगिती कायम

नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाची स्थगिती कायम १९ जूनपर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे.

महाराष्ट्र दिनी पुण्यातील मार्केट यार्ड राहणार बंद!

गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व विभाग राहणार बंद. तर बंदमध्ये तरकारी, गुळ-भुसार, फुलबाजार कांदा बटाटा, पान आणि केळी बाजाराचा समावेश असून शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणू नये असं प्रशासनाने आवाहन केलं आहे.

खरातला आज पुन्हा न्यालयात हजर केलं जाणार

नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्याला आज पुन्हा न्यालयात हजर केलं जाणार आहे.

TCS  मधील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार

बच्चू कडू आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेणार

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते आपली राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही पत्रकार परिषद होणार आहे.

IPS अधिकारी अजय पाल शर्मा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

IPS अधिकारी अजय पाल शर्मा यांना पश्चिम बंगालमधील पोलीस पर्यवेक्षक पदावरून हटवण्याची विनंती करण्यासाठची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अजय पाल शर्मा यांचा पश्चिम बंगाल मधील वादग्रस्त व्हिडीओ नंतर याचिकाकर्ते आदित्य दास यांनी सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली आहे.

 West Bengal Voting : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात मतदान

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकच येणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांकडून संघावर प्रशासक येऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघावर नव्या कायद्यातील तरतुदीनुसार सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक येणारच असे स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांसह नेत्यांना धक्का बसला आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपकडून ५ नावांची घोषणा

भाजपने जाहीर केलेल्या यादीत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या नावांचा समावेश आहे. तर प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

Massajog Election Results : मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं गाव असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख हे सरपंच पदाचे उमेदवार होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com