Maharashtra Live News Update : बलिदान दिलेल्या शूर पोलिसांना अजित पवार यांच्याकडून आदरांजली

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५, आज लक्ष्मीपूजन; राज्यातील राजकीय, प्रशासकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Ajit Pawar News : पोलिसांच्या बलिदानाला ‘जनरल सॅल्यूट’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलीस संशोधन केंद्र येथे आजच्या ‘पोलीस स्मृतिदिना’निमित्त देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाला ‘जनरल सॅल्यूट’ देत भावपूर्ण आदरांजली वाहिली. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चीनच्या हल्ल्याचा शौर्यानं प्रतिकार करत सी.आर.पी.एफ.च्या १० जवानांनी वीरमरण पत्करलं. त्यांच्या या अद्वितीय शौर्यस्मरणार्थ दरवर्षी हा दिवस ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो.

Mumbai News: मुंबईतील हवा सर्वात खराब

मुंबईच्या हवेची गुणवत्ता सोमवारी अत्यंत खराब असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबई हे जगातील दुसरे सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. शहर आणि उपनगरांत अनिर्बंध फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 334 अंकांवर गेला, तर संपूर्ण शहराचा एक्यूआय १८७ नोंद झाला.

धर्मादाय आयुक्तांची हकालपट्टी करा: रवींद्र धंगेकर

पुण्यातील जैन समाजाच्या जागा वाद प्रकरणी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Mumbai News:  14व्या मजल्यावरील एका सदनिकेला आग

नवी मुंबई: वाशी येथील घराला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. रहेजा कॉम्प्लेक्समध्ये 14व्या मजल्यावरील एका सदनिकेला ही आग लागली होती. त्यानंतर ही आग बाजूच्या सदनिकेतही पसरली. या आगीत तीन सदनिकांचं नुकसान झाले आहे.

कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज आमदारांची भेट घेणार आहेत, हे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.

चाळीसगाव (जि, जळगाव) येथे मध्यरात्री दोन गटात हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कट का मारला, यावरुन हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहेे. आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com