Uddhav Thackeray : मोठी बातमी ! 'आप'च्या पराभवाचे महाराष्ट्रात हादरे; उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

AAP defeat in Maharashtra News : या निवडणुकीत 'आप'चा पराभव झाल्याची चर्चा जोरात आहे. या पराभवानंतर काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर काँग्रेसला टोला लगावला.
Uddhav Thackeray, Arvind Kejriwal
Uddhav Thackeray, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New dehli News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले आप आणि काँग्रेस हे दोन पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे या निवडणुकीत 'आप'चा पराभव झाल्याची चर्चा जोरात आहे. या पराभवानंतर काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर काँग्रेसला टोला लगावला. आणखी भांडत बसा, असा टोमणाही त्यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना लगावला आहे.

त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी देखील इंडिया आघाडीच्या दिल्लीतील प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच महाविकास आघाडीत राहण्याबाबत पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून येत्या काळात एकत्र काम करायचे का नाही ? याचा विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याचे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Arvind Kejriwal
Delhi AAP news : 'शीश महाल', 'मद्य प्रकरणा'मुळे 'आप'ची साफसफाई

दिल्लीतील आपच्या पराभवानंतर इंडिया आघाडीतील नेते चिंता व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राहण्याबाबत पक्षातील इतर नेतेमंडळीशी याबाबत चर्चा करणार आहेत. त्या चर्चेत महाविकास आघाडीत एकत्र काम करायचे का नाही? याचा विचार करणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितल. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का अशी चर्चा जॊरात रंगली आहे.

Uddhav Thackeray, Arvind Kejriwal
Delhi AAP news : 'शीश महाल', 'मद्य प्रकरणा'मुळे 'आप'ची साफसफाई

दिल्लीत पार पडलेल्या राहुल गांधी (rahul Gandhi) यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेवेळी मी स्पष्ट केले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राबविण्यात आलेला पॅटर्न दिल्लीत राबवण्यात आला आहे. राजकारणात ‘अघोरी पॅटर्न’ काही काळ चालतो. महाकुंभमध्ये मोदी गेले, तसेच कन्याकुमारीमध्ये कुठे कुठे जातात मतदानाच्या दिवशी ते जातात, मी किती कडवट हिंदू आहे हे दाखवायचा प्रयत्न ते करीत असतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Uddhav Thackeray, Arvind Kejriwal
Delhi BJP CM Face News : अडीच दशकांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेवर येणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण?

दिल्लीतील निवडणुकीत केजरीवाल पराभूत झाले. या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले हेच आहे. आमच्या इंडिया ब्लॉकमधील दोन पक्ष एकत्र आले असते तर निकाल वेगळा लागला आसता. फरक फार मोठा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात होत असेलल्या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray, Arvind Kejriwal
Jayant Patil : राज्यात पुन्हा भूकंप? NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? गडकरींचा इस्लामपूर दौऱ्याचं नेमकं कारण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com