Imtiaz Jaleel On Abu Azmi : अबू आझमी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठीच औरंगजेबाचा मुद्दा उकरून काढला!

Abu Azmi's statement on Aurangzeb was made to defend Devendra Fadnavis, claims Imtiaz Jaleel : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केलेली असताना अबू आझमी यांनी औरंगजेब यांचा विषय काढण्याचा हेतू आपले मित्र देवेंद्र फडणवीस यांचा बचाव करणे एवढाच होता.
Abu Azmi-Devendra Fadnavis-Imtiaz Jaleel News
Abu Azmi-Devendra Fadnavis-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे विधान करत खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाचे पडसादही उमटले. मात्र कुठलेही कारण नसतांना आझमी यांनी औरंगजेबाचा विषय उकरून कशासाठी काढला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या संदर्भात आझमी यांच्यावर गंभीर आरोप केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केलेली असताना अबू आझमी यांनी औरंगजेब यांचा विषय काढण्याचा हेतू आपले मित्र देवेंद्र फडणवीस यांचा बचाव करणे एवढाच होता. अबू आझमी त्यांच्या मालकाच्या म्हणजेच भाजप सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, असा घणाघातही इम्तियाज जलील यांनी केला.

विधानसभेच्या अधिवेशनात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच समाजवादी पक्षाचे नेते अबू आसीम आजमी (Abu Azmi) पुन्हा एकदा त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठी आले आणि त्यांनी हा मुद्दा औरंगजेबाकडे वळवला. हे त्यांच्या मालकाच्या म्हणजेच भाजपच्या इशाऱ्यावर करण्यात आले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी दिलेले विधान एका विशिष्ट हेतूने केले होते.

Abu Azmi-Devendra Fadnavis-Imtiaz Jaleel News
Abu Azmi controversy : 'सपा'च्या अबू आझमींचं वादग्रस्त विधान, क्रूरकर्मा औरंगजेबावर उधळली स्तुतीसुमनं; म्हणाले, 'उत्तम प्रशासक....'

औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, एवढंच नाही तर त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के होता. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे. संभाजी महाराज आणि औरंगजेबमधील लढाई सत्ता मिळवण्यासाठीची होती. त्यांच्यात धर्माची नाही तर, सत्तेसाठी लढाई झाली,असे विधान अबू आझमी यांनी केले होते.

Abu Azmi-Devendra Fadnavis-Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel News : पक्ष सोडून जा, पण ज्यांनी मोठं केलं त्यांच्याबद्दल वाईट तर बोलू नका! इम्तियाज जलील यांचा शिंदे गटाला सल्ला..

त्यांनी हा मुद्दा टाळायला हवा होता आणि सरकारवर हल्ला करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. विशेषतः पवित्र रमजान महिन्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या कोणत्याही समस्येसाठी ते पूर्णपणे जबाबदार असतील. आणि हो, सर्व वृत्तवाहिन्या मुघलांवर चर्चा करत असल्याने भाजप-सपाचा गेमप्लॅन यशस्वी झाल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com