
Maharashtra politics news : राज्यातील महायुती सरकार हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समाजवादी पक्षाचे मुंबईतील आमदार अबू आझमी यांनी औरंजेबाचे कौतुक करून नवीन वादाला तोंड फोडले आहे.
आमदार अबू आझमींच्या या कौतुकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार राम कदम आक्रमक झाले आहेत. शिवरायांचा अजून किती अपमान या सरकारच्या काळात होणार, असा घणाघात आमदार ठाकरे यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे म्हणून कौतुक केले. औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा ही अफगाणिस्तानपर्यंत होती. जीडीपी 24 टक्के एवढा होता. भारताला त्यावेळी 'सोने की चिड़िया', असे म्हटले जात होते. असे असताना चुकीचे म्हणू का? असा सवाल अबू आझमी यांनी केला.
अबू आझमी (Abu Azmi) एवढ्यावर थांबले नाहीत तर, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही, असेही म्हटले.
अबू आझमी यांचे हे विधान समोर येताच, भाजप आमदार राम कदम चांगलेच आक्रमक झाले. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही, त्यांना इतिहासाचे पुस्तक भेट देणार असल्याचे म्हटले आहे. विधान सभागृहात जेव्हा ते येतील, त्यांना नक्की इतिहासाचे पुस्तक भेट देईल, असे आमदार कदम यांनी म्हटले आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना कसा कैदेत ठेवले, छळ केला, हे अबू आझमी यांना माहित नाही का? असा सवाल ही आमदार कदम यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे देखील अबू आझमी यांच्या विधानावर आक्रमक झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमींविरोधात कारवाई झाली पाहिजे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करण्याची यांची हिमंत कशी होते? राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर याच्याविरोधात देखील कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.