Sayaji Shinde : ‘...तर अजितदादांच्या 40 आमदारांचं काही खरं नाही!’ सयाजी शिंदेंचा कडक इशारा

Sayaji Shinde’s Strong Warning : अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटावर कडक इशारा दिला आहे. “अजित दादांच्या आमदारांबद्दल विधान केलं आहे.
Sayaji Shinde Ajit Pawar
Sayaji Shinde Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत राजकारण, समाजकारण आणि निसर्ग संवर्धनाबाबत मोकळेपणाने मत व्यक्त केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला असला, तरी त्यांचा हेतू राजकारण नव्हे तर पर्यावरण संवर्धन असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

सयाजी शिंदे म्हणाले,"मी अजितदादांच्या पक्षात मैत्रीच्या बोलीवर गेलो. मला राजकारण करायचं नाही, पक्षासाठी भांडायचं नाही. माझं ध्येय स्पष्ट आहे – मला निसर्ग वाचवायचा आहे, देवराया उभ्या करायच्या आहेत." त्यांनी सांगितलं की, पक्षाने त्यांना झाडे आणि निसर्ग संवर्धनासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते अजून पूर्ण झालेलं नाही.

ते पुढे म्हणाले, "जे 40 आमदार निवडून आले आहेत, त्यांनी 40 देवराया उभ्या केल्या नाहीत, तर खरं नाही! मला त्यांनी शब्द दिला होता, पण अजून काहीच झालेलं नाही. हे बरोबर नाही. आमदार-खासदारांनी याकडे लक्ष द्यायला हवं. त्यांनी दिलेलं वचन पूर्ण केलं नाही, तर त्यांचं काही खरं नाही." अशा थेट शब्दांत शिंदेंनी अजित पवारांच्या आमदारांना इशारा दिला.

Sayaji Shinde Ajit Pawar
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी मांडले कुंभमेळ्याचे 'व्हिजन'; म्हणाले, मोठी कामे करताना थोडा त्रास होणारच!

सयाजी शिंदे यांनी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम केलं आहे. अजित पवारांनीदेखील शिंदेंचं कौतुक करताना म्हटलं होतं, “सयाजी शिंदे यांना झाडांची खास आवड आहे. त्यांनी ‘सह्याद्री देवराई’ या उपक्रमातून चांगलं काम केलं आहे.

Sayaji Shinde Ajit Pawar
Police Bharti 2025 : पोलिसात भरती व्हायचंय? 'वर्दी'चे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! A ते Z माहिती फक्त एका क्लिकवर...

मात्र आता शिंदेंच्या वक्तव्यामुळे पक्षातील आमदारांकडे आणि त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी दिलेला “देवराया उभ्या करा, नाहीतर खरं नाही” हा इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com