Ajit Pawar Tribute : सभागृह अथवा आयुष्य काहीच पूर्वीप्रमाणे नसणार; पाणवलेल्या डोळ्यांनी अदिती तटकरेंची प्रतिक्रिया

Ajit Pawar legacy News : सभागृह अथवा आयुष्यामध्ये आता काहीच पूर्वीप्रमाणे नसणार अशी प्रतिक्रिया पाणवलेल्या डोळ्यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar, Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : बारामती विमानतळाजवळ बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतनामात त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांच्या अकाली निधनाने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातच आता अजितदादांची लाडकी आमदार आणि लेकीसमान अशी ओळख असणाऱ्या अदिती तटकरे यांना अजितदादांच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे. सभागृह अथवा आयुष्यामध्ये आता काहीच पूर्वीप्रमाणे नसणार अशी प्रतिक्रिया पाणवलेल्या डोळ्यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

अजितदादांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जाण्याचा मोठा धक्का महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांना बसला आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अनवर झाल्या आहेत. दादा हे चांगले काम केले तर प्रशंसा करायचे. थोड्या कुठे चुका झाल्या तर हक्काने वडिलांसारखे ओरडतही होते. त्यासोबतच मार्गदर्शनदेखील करत होते. एक दिवस असा गेला नाही की दादांचे नाव तोंडातून निघाले नसेल किंवा त्यांची दिवसभरात आठवण काढली नसेल. ही आठवण कायम मनात राहील, असे अदिती तटकरे म्हणाल्या.

Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar : कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या अजितदादांचं आणखी एक स्वप्न राहिलं अधुरं, स्नेहमेळाव्याची सुरु होती तयारी...

अजितदादांची सगळ्यात आवडती आमदार असे विचारले की अजितदादा हे अदिती तटकरेंच नाव घ्यायचे. सगळ्यात हुशार आमदार, सर्वात चांगले काम कोण करते या सगळ्या प्रश्नांचे उत्तर अदिती तटकरेंभोवती येऊन थांबत होते. यावर अदिती तटकरे म्हणाल्या, 'आम्ही नेता गमावला आमचा. त्यांना परत बघता नाही येणार. याचे दुःख आम्हाला आहे. कधीही न भरून येणार दुःख आहे. 'एकच दादा अजितदादा', असे म्हणताना त्यांचे डोळे पाणवले होते.

Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar : कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या अजितदादांचं आणखी एक स्वप्न राहिलं अधुरं, स्नेहमेळाव्याची सुरु होती तयारी...

अजितदादांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिले,आधार दिला. प्रत्येक बाबतीत त्यांची आठवण येत राहील. दादांनी भरभरून प्रेम दिले. माझ्या वडिलांचे जसे मार्गदर्शन मिळत आले त्याप्रमाणे त्यांचंही नेहमी मिळत आले. एखाद्या कार्यकर्त्याला कसं घडवायचं ?त्याला ताकद कशी द्यायची ? त्याला प्रशासकीय ज्ञान कसं द्यायचं ? हे दादांकडून घेण्यासारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar reforms : महिलांपासून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल; अजितदादांनी घेतलेले काही क्रांतिकारक निर्णय

मला आठवते मी 2019 मध्ये जेव्हा आमदार झाले, त्यावेळी पहिले भाषण सभागृहात कसे करायचे हे मी दादांकडून शिकले. अगदी बजेटवरचे मुद्दे कसे मांडायचे, पुरवणी मागण्या, भाग क्रमांक पान क्रमांक बोलून कसे उठायचे, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. सभागृह हे आधी सारखं नसणार आहे. आणि आमच्या सगळ्यांचा आयुष्यही त्यांच्याविना आधी सारखा नसणार, असे मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) जड अंतःकरणाने म्हणाल्या.

Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar Last Rites: चारच दिवसांमध्ये अजितदादांनी केलेलं विधान खरं ठरलं! त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

अजितदादांनी नेहमीच आम्हा सगळ्यांना पाठबळ दिले,आधार दिला. प्रत्येक बाबतीत त्यांची आठवण येत राहील. दादांनी भरभरून प्रेम दिले. माझ्या वडिलांचे जसे मार्गदर्शन मिळत आले त्याप्रमाणे त्यांचंही नेहमी मिळत आले. एखाद्या कार्यकर्त्याला कसं घडवायचं ?त्याला ताकद कशी द्यायची ? त्याला प्रशासकीय ज्ञान कसं द्यायचं ? हे दादांकडून घेण्यासारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar Last Rites: चारच दिवसांमध्ये अजितदादांनी केलेलं विधान खरं ठरलं! त्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

मला आठवते मी 2019 मध्ये जेव्हा आमदार झाले, त्यावेळी पहिले भाषण सभागृहात कसे करायचे हे मी दादांकडून शिकले. अगदी बजेटवरचे मुद्दे कसे मांडायचे, पुरवणी मागण्या, भाग क्रमांक पान क्रमांक बोलून कसे उठायचे, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. सभागृह हे आधी सारखं नसणार आहे. आणि आमच्या सगळ्यांचा आयुष्यही त्यांच्याविना आधी सारखा नसणार, असे मंत्री अदिती तटकरे जड अंतःकरणाने म्हणाल्या.

Ajit Pawar, Aditi Tatkare
Ajit Pawar Passed Away : प्रमोद महाजन ते अजित पवार; महाराष्ट्राने अकाली गमावलेले 8 दिग्गज नेते..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com