

Shiv Sena UBT response to Operation Tiger: आम्ही विधानसभा निहाय आढावा घेतला असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. खासदार गटाच्या बाबतीत पसरत असलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये.
सर्वजण आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. 'ऑपरेशन लोटस' किंवा 'टायगर' ऑपरेशन लेपर्ड हे काही होणार नाही त्या केवळ अफवा असल्याचे आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोक अंधभक्त असतात.मात्र, आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर अंधविश्वास ठेवतो. उद्धव ठाकरेंवर लोकांनी विश्वास ठेऊन आमच्या खासदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
रविवारी उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्याला प्रत्यक्ष चार खासदार उपस्थित होते तर पाच खासदार हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
खासदार राजेश देशमुख यांनी दिल्लीत शिंदेंचे मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पाच खासदार फुटून नवीन गट स्थापन करणार असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे खासदास संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना एकच आहे आणि ती संसदेत अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात काम करते आहे. गेले, जाणार आहेत असे मी गेल्या दोन वर्षांपासून ऐकतो आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंसोबत सर्व खासदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.