Aditya Thackeray : महाराष्ट्राचा अपमान करत राहायचे का?, आदित्य ठाकरे यांचा केंद्र सरकारला खरमरीत सवाल

Aditya Thackeray On BJP Modi government : उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केंद्र सरकावर दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीवरून टोला लगावताना खरमरीत टीका केली आहे.
Aditya Thackeray | PM Modi
Aditya Thackeray | PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विमानतळावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावत खरमरीत टीका केली आहे. त्यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट टाकत दिवंगत दि.बा. पाटील यांचे स्मरण केले आहे. त्यांनी केंद्राला महाराष्ट्राचा अपमानच करत राहायचं आहे का असा सवाल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव घेतले आहे. 2022 मध्ये आमच्या महाविकास आघाडी सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे ठरवले होते. तसेच याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. पण अद्यापही या शिफारशीवर केंद्राने विचार केलेला नाही.

Aditya Thackeray | PM Modi
Aditya Thackeray Video : आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, केली मोठी मागणी

आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून याबाबत अनेकदा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला आठवण करून देण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. त्याच शिफारशीबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये देखील म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपण सादर केलेला प्रस्ताव आणि शिफारस नागरी उड्डाण मंत्र्यांनी आजच्या महत्वाच्या दिवशी मंजूर करावा, अशीही मागणी केली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळाला देखील छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबत देखील 2020 पासून प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Aditya Thackeray | PM Modi
Aditya Thackeray : आम्ही एक पाऊल पुढे टाकले! उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीमागचं गुपित आदित्य ठाकरेंनी सांगितलं...

तर राज्यातील प्रस्ताव किंवा राज्य सरकारने केलेल्या शिफारशी अशा पद्धतीने प्रलंबित ठेवणं केंद्राला शोभत का? ही केंद्रातील भाजप सरकारची पद्धत आहे का? तर अशा प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केंद्र सरकार करू इच्छित आहे का? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com