Aditya Thackeray Tweet on Kejriwal Arrest : 'स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाहीत आहोत का?' केजरीवालांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंचा घणाघात

Aditya Thackeray Tweet on Kejriwal Arrest : 'डेमोक्रेसी टू डी मॉकरी' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एक्स हँडलवरून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशभरात केजरीवालांच्या अटकेमुळे नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे.
Aditya Thackeray Arwind Kejriwal
Aditya Thackeray Arwind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray on Democracy: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केजरीवालांच्या अटकेनंतर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'डेमोक्रेसी टू डी मॉकरी' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. Aditya Thackeray Tweet on Kejriwal Arrest

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना काल रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ED)  ईडीने मद्य घोटाळाप्रकरणी Arvind Kejriwal corruption charges अटक केली. याविषयी आदित्य ठाकरेंनी एक्स हँडलवरून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 'विरोधी आघाडीतील एका विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं, आणखी एका विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अटक होण्यापूर्वी राजीनामा दिला. विरोधी पक्षाची खाती गोठवली. हीच यांची 'डेमोक्रेसी टू डी मॉकरी' आहे असं आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) म्हटलं आहे.

Aditya Thackeray Arwind Kejriwal
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचीही वाटचाल केजरीवालांच्या दिशेने?

'अगदी महिनाभरापूर्वी झालेल्या चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीची धक्कादायक निवडणूक (Election) प्रक्रिया' कॅमेऱ्यात कैद झाली. राजकीय विरोधकांना निर्लज्जपणे सरकारी एजन्सींच्या माध्यमातून विकत घेतलं जातंय किंवा तोडलं जातंय. यापुढे आपण स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाही आहोत हे जगासमोर खोटं बोलायचं आहे का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

केजरीवालांच्या अटकेमुळे आप नेते आक्रमक

केजरीवालांच्या अटकेमुळे दिल्लीसह देशभरातील आम आदमी पक्षाचे (AAP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारकडून सातत्याने विरोधी पक्षांवर होणाऱ्या ईडी कारवायांमुळे देशभरात नकारात्मक वातावरण निर्माण झालं असतानाच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना (Arvind Kejriwal) अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्ष आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Aditya Thackeray Arwind Kejriwal
Arvind Kejriwal News : केजरीवाल राजीनामा देणार की जेलमधून सरकार चालवणार? काय आहे नियम?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com