Ashok Chavan News: माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मोठे खिंडार पडले आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन आमदार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे हे चार आमदार नॉट रिचेबल असून ते मुंबईत अशोक चव्हाणांसोबत असल्याची चर्चा जोरात आहे.
चव्हाण हे भाजपात जाणार असल्याचे निश्चित झाले असून. त्यांच्या समवेत नांदेड जिल्ह्यातील चार आमदार असल्याचे समजते. हिमायतनगरचे आमदार माधवराव जवळगावकर, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर हे चार आमदार नॉट रिचेबल असल्याचे समजते. विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर (Amar Rajurkar) हे पण त्यांच्या समवेत आहेत.
नांदेड जिल्ह्यात आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे, जितेश आंतापुरकर व अशोक चव्हाण हे चार आमदार आहेत. काँग्रेस पक्षाचा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर या तीन आमदारांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार जितेश आंतापुरकर या आमदरांशी संपर्क साधुन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते नाॅट रिचेबल होते.
याशिवाय जिल्ह्यातील अनेक माजी आमदार, काँग्रेसचे पदाधिकारी अशोक चव्हाण यांच्या निर्णयावर बोलायला तयार नाहीत. अशोक चव्हाण यांच्या बंगल्याशेजारीच राहणारे माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमर राजूकर यांच्या घराबाहेरही शुकशुकाट पसरला आहे. ऐरवी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी आणि गाड्यांची वर्दळ असलेले अशोक चव्हाण यांच्या आनंद निलयम या बंगल्यातही शुकशुकाट होता.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांचे कट्टर समर्थक असलेले विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी पण काँग्रेसचा पदाचा राजीनामा दिला असल्याचे समजते.