Suresh Kalmadi : शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 'मॅनेज दिल्ली' राबवणारे मित्र सुरेश कलमाडी; नेमका काय होता डिनर डिप्लोमिसीचा किस्सा

Behind the scenes Indian politics story : शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी राबवलेल्या ‘मॅनेज दिल्ली’ रणनीतीमागची कथा, सुरेश कलमाडी आणि डिनर डिप्लोमसीचा नेमका किस्सा.
Suresh Kalmadi Sharad Pawar PM manage Delhi story
Suresh Kalmadi Sharad Pawar PM manage Delhi storySarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव कलमाडी हाऊस या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे आणि महाराष्ट्रासह दिल्लीच्या राजकारणात मोठी भूमिका बजावलेल्या कलमाडी यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. शरद पवार यांनी नुकतेच त्यांची भेट घेतली होती. पवार आणि कलमाडी यांच्या मैत्रीचे काही किस्से सांगितले जातात त्यामध्ये कलमाडी यांनी पंतप्रधान करण्यासाठी जोर लावला होता त्याचा एक किस्सा चर्चेला जातो.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला होता. पंतप्रधानपदासाठी नरसिंह राव, शरद पवार, अर्जुन सिंग आणि शंकरदयाल शर्मा यांची नावे चर्चेत होती. यावेळी राजीव गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे कलमाडी यांनी पवारांना पंतप्रधान करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मराठा स्ट्राँगमॅन' अशी ओळख असलेले शरद पवार पंतप्रधान व्हावेत म्हणून कलमाडी यांनी पुढाकार घेत ' पंतप्रधान करण्यासाठी 'मॅनेज दिल्ली' हे अभियान राबवले होते. रशीद किडवाई यांच्या '२४ अकबर रोड' या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

एकेकाळी दिल्ली दरबारी लॅव्हीश' पार्ट्याचा आयोजन करण्यामध्ये सुरेश कलमाडी यांचा हातखंडा होता. आपल्या या खुबीचा वापर करत कलमाडींनी पवारांचे लॉबिंग करण्यासाठी एका रात्री नव्याने लोकसभेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदारांसाठी एका पंचतारांकित हॉटेलात 'लॅव्हीश डिनर' चे आयोजन केले होते.

Suresh Kalmadi Sharad Pawar PM manage Delhi story
Ajit Pawar : "दादा येणार, गुलाल उधळणार? अजित पवारांच्या एका दौऱ्यावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य

या पार्टीला 64 खासदारांनी उपस्थिती देखील लावली होती. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी त्यावेळी सुरेश कलमाडी यांनी चांगला प्लॅन आखला होता. यामुळे काँग्रेस पक्षासह सर्वच वरिष्ठ नेत्यांना याचा धक्काच बसला होता. त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या नव्हत्या. मात्र त्यांनासुध्दा या घटनेने आश्चर्यचकित केले.

या पार्टीला 64 खासदारांनी उपस्थिती देखील लावली होती. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी त्यावेळी सुरेश कलमाडी यांनी चांगला प्लॅन आखला होता. यामुळे काँग्रेस पक्षासह सर्वच वरिष्ठ नेत्यांना याचा धक्काच बसला होता. त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या नव्हत्या. मात्र त्यांनासुध्दा या घटनेने आश्चर्यचकित केले.

Suresh Kalmadi Sharad Pawar PM manage Delhi story
Riteish Deshmukh : रवींद्र चव्हाणांचा 'घाव' देशमुख बंधुंच्या जिव्हारी; रितेशने दोन वाक्यातच दिलं 'सणसणीत' उत्तर

नंतर काही नाट्यमय घडामोडींमुळे पवारांची डाळ शिजली नाही. त्यानंतर नरसिंह राव यांची वर्णी पंतप्रधानपदी लागली. शरद पवार यांना महत्त्वाचे असे संरक्षणमंत्रीपद दिले गेले होते. तर, त्यानंतर कलमाडी यांनी आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी केलेल्या धडपडीमुळे कलमाडी यांना काही काळ रेल्वेमंत्री करुन पवार यांनी परतफेड गेली होती असं देखील बोलले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com