Rohit Pawar : रोहित पवार करणार अजितदादांचे स्वागत; कर्जत जामखेडमध्ये बॅनर झळकले!

Rohit Pawar Welcomes Deputy CM Ajit Pawar: कर्जत-जामखेडमध्ये लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे.
MLA Rohit Pawar welcomes Deputy Chief Minister Ajit Pawar during his visit to Karjat-Jamkhed with a public banner
MLA Rohit Pawar welcomes Deputy Chief Minister Ajit Pawar during his visit to Karjat-Jamkhed with a public banner Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Visits Karjat-Jamkhed: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आज पहिल्यांदा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी मोठी बातमी या परिसरातून येत आहे.

अजित पवार यांच्या स्वागतासाठी कर्जत-जामखेड परिसरात विविध ठिकाणी बॅनर लागले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

MLA Rohit Pawar welcomes Deputy Chief Minister Ajit Pawar during his visit to Karjat-Jamkhed with a public banner
Gopichand Padalkar: शरद पवारांना फॉर असलेल्या संघटनाच असे विषय बाहेर काढतात; पडळकरांचा गंभीर आरोप

राज्यात सत्ताधारी- विरोधक यांच्या गाठीभेटी होत असतानाच आता अजितदादा आणि रोहित पवार एकत्र येणार का? असा प्रश्न हे बॅनर पाहिल्याल्यावर पडतो. अजितदादांच्या स्वागतासाठी रोहित पवार यांच्या नावानं बॅनर लागले आहे.

एकीकडे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी-गाठी होत आहे. तर दुसरीकडे कर्जत-जामखेडमध्ये लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्यावतीने शिव शाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे गुरुवारी जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लागले आहे.

गेल्या आठ दहा दिवसात अजित पवार आणि शरद पवार हे तिसऱ्यांदा एकत्र येते आहे. यापूर्वी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे आपण पाहिले आहे.

एआय विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे सकाळी 9 वाजता 21 एप्रिल रोजी बैठक होत आहे. त्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com