Gopichand Padalkar: शरद पवारांना फॉर असलेल्या संघटनाच असे विषय बाहेर काढतात; पडळकरांचा गंभीर आरोप

Gopichand Padalkar Criticism ON Sharad Pawar:वाघ्या कुत्र्याच्या समाधी बाबतचे खुसपट हे संभाजी ब्रिगेडने काढलं आहे. जेव्हा सत्ता जाते त्यांचा नेता अडचणीत येतो तेव्हा संभाजी ब्रिगेड असे विषय शोधून काढते.
Sarkarnama
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यात रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून वाद सुरू आहे. या वादाच्या निमित्ताने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी फावल्या वेळामध्ये त्यांच्या राजकारणाला पूरक असा इतिहास लिहून काढावा, अशी उपरोधक टीका पडळकर यांनी केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित धनगरी नाद या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. या सोहळ्यात 50000 धनगरी ढोलांचे सामूहिक वादन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

राज्यात सुरू असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाच्या वादावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, "वाघ्या कुत्र्याच्या समाधी बाबतचे खुसपट हे संभाजी ब्रिगेडने काढलं आहे. जेव्हा सत्ता जाते त्यांचा नेता अडचणीत येतो तेव्हा संभाजी ब्रिगेड असे विषय शोधून काढते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक असणाऱ्या या संघटना नवा इतिहास शोधून काढत असतात. त्यामुळे वाद निर्माण होत असतात. शरद पवारांना फॉर असलेल्या या संघटना असे विषय बाहेर काढतात,"

Sarkarnama
Socialist Movement India: तरुणांचे तीन लाडके नेते उंदरांचा सुळसुळाट असलेल्या इमारतीत गुप्तपणे भेटत...

"ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांची माथी भडकवून सत्ता लाटण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता. हा प्रयत्न 2014, 2019 ला आणि आता 2024 ला देखील लोकांनी हाणून पाडला आहे. काही इतिहासकार पवारांच्या राजकारणाला फॉर असा इतिहास लिहित आहेत. त्यातून रोज नवीन वाद सुरू होत आहेत. त्यामुळे शरद पवारांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचा पूर्ण पक्ष अजित पवारांकडे दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फवला वेळ आहे. या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना हवा तसा इतिहास लिहिला पाहिजे," असा टोला त्यांनी लगावला.

कुठल्या जातीला टार्गेट करायचे, कुठली जात मातीत घालायची, कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं आणि कुठल्या महापुरुषाला वर काढायचं. कुठल्या महापुरुषाला दाबल्यानंतर मताच राजकारण होईल, कोणत्या जातीला जास्त शिव्या दिल्यानंतर मत वाढतील. पुढच्या दोन-तीन पिढ्यामातीत जातील, अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी लिहावा, असे पडळकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com