Radhakrishna Vikhe: विखे, तुम्ही संधीसाधू, इकडे तिकडे उड्या मारून मंत्रिपदं घेता; थोरातांचा हल्लाबोल

Thorat Vs Vikhe : पण आम्ही पुरून उरू..
Thorat Vs Vikhe
Thorat Vs Vikhe Sarkarnama

Nagar : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच संगमनेर येथे झाला. वडगावपान येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात त्यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री'असा उल्लेख करण्यात आला.

निळवंडे धरणाचे पाणी वडगावपान परिसरात पोहोचल्याने थोरातांचा सत्कार करण्यात आला. भाषणादरम्यान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका

"आम्ही काँग्रेसशी इमानदार राहिलो. तुम्ही संधीसाधू, इकडे तिकडे उड्या मारून मंत्रिपदं घेता. मात्र, जनतेला हे मान्य नाही," अशा शब्दांत थोरातांनी विखेंना टोला लगावला. संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला आम्ही पुरून उरू. सरकार म्हणून प्रशासनावर तुमची पकड आहे की नाही? असा सवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता थोरातांनी केला.

Thorat Vs Vikhe
Suresh Kute : बीडचे दिग्गज उद्योजक भाजपच्या वाटेवर; सुरेश कुटेंचा लवकरच प्रवेश!

कायद्याचा फेरविचार व्हावा...

2005 च्या समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र, आता या कायद्यालाच विरोध होत आहे. याबाबत थोरातांनी आपली भूमिका स्पष्ट केली. समन्यायी पाणीवाटप कायद्याचा फेरविचार व्हावा, असे ते म्हणाले.

पण आम्ही पुरून उरू

"चांगली कामे करण्यासाठी आम्ही राहता येथे जातो, तुम्ही मात्र संगमनेर तालुक्यात दहशत माजवण्यासाठी आणि विकास मोडण्यासाठी येतात. खोट्या केसेस टाकून संगमनेरच्या लोकांना त्रास देण्याचे उद्योग सुरू आहेत. पण आम्ही पुरून उरू," असा सज्जड दम त्यांनी दिला.

आम्हाला शिकवता?

आपला विकास थांबवणाऱ्यांना घेऊन नाचू नका. मी दहा वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग केला.तुमच्याकडून अजून नगर-मनमाड महामार्ग होत नाही. कोल्हापूरचा पूल अजून लटकलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही विकासाच्या गप्पा मारता? आणि आम्हाला शिकवता? असा रोखठोक सवाल थोरातांनी विखेंना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com