Suresh Kute : बीडचे दिग्गज उद्योजक भाजपच्या वाटेवर; सुरेश कुटेंचा लवकरच प्रवेश!

Suresh Kute will join BJP : अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत पक्ष प्रवेश होणार आहे.
Suresh Kute
Suresh KuteSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : तेल, पशुखाद्य, डेअरी या उद्योगाचे राज्यभर जाळे विणून देशात वाढत असलेल्या द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, केवळ मुहूर्त चाचपला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Kute
Radhakrishna Vikhe Patil : विखेंच्या साखर पेरणीत मिठाचा खडा?, विवेक कोल्हेंची दुष्काळाच्या मुद्द्यावरून टीका!

कापड दुकान ते 19 कंपन्यांचा 17 हजार कोटी रुपयांचे असेट असलेला द कुटे ग्रुपचे चेअरमन सुरेश कुटे आतापर्यंत राजकीय मांडवापासून दूर होते. मधल्या काळात त्यांच्या समूहाची केंद्रीय आयकर विभागाने नियमित तपासणी केल्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून ठेवी काढण्यासाठी झुंबड उडाली होती. आजही या मल्टिस्टेटची आर्थिक घडी बसलेली नाही. मात्र, त्यांनी त्यांच्या द कुटे ग्रुपमध्ये साडेचार हजार कोटी रुपयांचा भागीदार घेतला आहे. त्यातून या ठेवीदारांचे पैसे देणार असल्याचे त्यांनी आजच जाहीर केले.

दरम्यान, त्यांच्या द कुटे ग्रुपमुळे जिल्ह्याचाही लौकिक झाला, तसेच हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. महिलांसाठी त्यांनी पत्नी आणि समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चना कुटे यांच्या पुढाकाराने त्यांच्या समूहात खास नोकऱ्यांची संधी निर्माण करून दिली आहे.

दिवाळीनंतर सुरेश कुटे यांचा हे भाजपमध्ये अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. दिल्लीत हा प्रवेश होणार आहे. आतापर्यंत राजकीय परीघपासून कोसो दूर असलेले सुरेश कुटे त्यांची ज्ञानराधा मल्टिस्टेट अडचणीत आल्यानंतरच भाजप प्रवेशाची चर्चा आणि त्यांना अडचणीत साडेचार हजार कोटी रुपयांचा व्यवहार होताच भाजप प्रवेशाची निश्चिती हा काही निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com