Maharashtra Assembly Elections : 'MIM'ने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले उमेदवार; जाणून घ्या, कोणाला दिली उमेदवारी?

Asaduddin Owaisi News : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यभरात जास्तीत जास्त ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष रणनीती आखत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एमआयएमने एक पाऊल पुढे टाकत विधानसभेसाठी पाच उमेदवार घोषितही केले आहेत.

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे(एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे. दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीला प्रस्तावही दिलेला आहे आणि सप्टेंबर मध्यापर्यंत जर याबाबत निर्णय झाला नाहीतर, निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इशाराही दिलेला आहे.

Asaduddin Owaisi
Imtiaz Jaleel News : एमआयएमची खेळी, मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात इम्तियाज जलील ?

एमआयएमने(AIMIM) जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. तर सोलापूरमधून फारुख शब्दी, धुळे येथून फारुख शहा, मालेगावातून मुफ्ती इस्माईल अन् मुंबईतून फैयाज अहमद खान यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Asaduddin Owaisi
Farooq Shabdi : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून फारूक शाब्दींना एमआयएमची उमेदवारी जाहीर

छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील(imtiaz jaleel ) यांना उमेदवारी जाहीर केली. पण ते कोणत्या मतदारसंघातून लढणार? याचा सस्पेंस मात्र कायम ठेवला. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी ही गुप्तता पाळण्यात आल्याचे बोलले जात असले तरी ओवेसी यांनी त्यांना मध्य ऐवजी पूर्व मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com