Solapur, 09 September : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून एमआयएम पक्षाकडून शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असुद्दिन ओवेसी यांनी शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमने आघाडी घेतली आहे.
एमआयएम (MIM) पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमधून शाब्दी यांच्या उमेदवारी घोषणा केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही फारूक शाब्दी (Farooq Shabdi ) यांनी एमआयएमकडून शहर मध्य मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूकल लढवली होती. त्या वेळी त्यांनी प्रणिती शिंदे यांना तगडं आव्हान दिलं होतं.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे हया तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे तो काँग्रेसचा बोलकिल्ला मानला जात आहे. प्रणिती शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी सर्वाधिक इच्छुक दिसून येत आहेत. महाविकास आघाडीतही या मतदारसंघावरून कलगीतुरा सुरू आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मागील तीन निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघावर दावा आहे. मात्र, इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही याच मतदारसंघावर दावा केला आहे. माजी आमदार आडम मास्तर यांनी लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना मदत केली आहे. त्यामुळे विधानसभेला काँग्रेसने मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील माजी नगरसेवक तौफिक शेख यांनीही निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच खुद्द काँग्रेस पक्षातही उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शाब्दी यांची उमेदवारी महत्वाची मानली जात आहे.
एमआयएमने आज छत्रपती संभाजी नगरमधून फारुक शाब्दी यांना सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दिन ओवेसी यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. आता फारुक शाब्दी यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.