

Ajit Pawar AI Audio: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. दादांवर प्रेम करणारी जनता, त्यांचे चाहते, सहकारी, कुटुंबिय आणि ग्रामस्थ सर्वांच्याच भावना दाटून आल्या आहेत. बुधवारी अजितदादांच्या पार्शिवावर अंत्यसंस्कार पार पडले. अशातच अजितदादांच्या शेवटच्या संदेशाच्या रुपात त्यांच्याच आवाजातील AI च्या मदतीनं बनवलेली एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना 'माझा प्रवास इथेच थांबतोय', असं म्हटलं आहे. पण ही संपूर्ण क्लीप ऐकल्यानंतर तुमच्याही भावना दाटून येतील. नेमकं या AI क्लिपमध्ये काय आहे? जाणून घेऊयात.
AIच्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या या ऑडिओ क्लीपमध्ये अजित पवारांच्या आवाजातील संदेश असा आहे. अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा. मलाबी अजित पवार म्हणतात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा खरंच, आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागीए, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जडए, पण एक समाधान आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतो की रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणी ही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचाच चेहरा होता.
माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचे मन दुखावले असेल. पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचे काम झाले पाहिजे. सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय. पण महाराष्ट्र थांबता काम नये. माझी ही जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो. राजकारण करा पण विकासाची गती थांबून देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पूसून शेवटचं सांगतो आता रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामचा माणूस अजितदादा पवार.
अजित पवारांच्या हुबेहुब आवाजातील AI च्या मदतीनं तयार केलेली ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर कोणाच्याही भावना दाटून येतील. खऱ्या जीवनात अशा प्रकारे मृत्यूनंतर कोणीही भावना प्रकट करु शकत नाही. पण एका सिनेमॅटिक पद्धतीनं ही ऑडिओ क्लीप बनवण्यात आली आहे. याची स्क्रीप्टही अजित पवारांच्या कामाची योग्य दखल घेणारी आहे. तसंच त्यात भाव-भावनांचा योग्य प्रकारे वापर केल्यानं ऐकणाऱ्यालाही प्रत्यक्षात अजित पवारच बोलत आहेत असा भास होतो. त्याचमुळं ही ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली असून ती ऐकून अनेकांच्या भावना दाटून आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.