Ajit Pawar Political News : अहमदपूर शहरात जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर भाष्य करत, जनतेची जाहीर माफी मागितली आहे.
'मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळवाऱ्यामुळे कोसळला. यासंदर्भात जे कोणी जबाबदार असतील, त्यांची चौकशी होईल. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी तमाम जनतेची माफी मागतो.' असं अजित पवारांनी(Ajit Pawar) सांगितलं आहे.
याशिवाय अजित पवार म्हणाले, 'काल-परवा एक गोष्ट घडलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या किल्ल्यावरील पुतळा पडला. सगळ्यांना वेदना झाल्या. हे असं अजिबात होता कामानये. कुठल्याही महापुरुषाच्या बाबतीत होता कामानये. ते महापुरुष आहेत, आज महाराजांचा इतिहास ऐकला तर अंगावर शहारे येतात. असा दैदिप्यमान महाराजांचा इतिहास आणि त्या महाराजांच्या पुतळ्याच्याबाबत जी घटना घडली, त्यात कुणीपण दोषी असो त्याला माफी नाही.'
तसेच 'यात काहीजण राजकारण करतात ते त्यांना लखलाभ. परंतु यामध्ये माफी अजिबात नाही. हे कुणालाही पटलेलं नाही. मी तर अहमदपूरमध्ये त्याबाबत माफीही मागितली. जे आपलं दैवत ते दैवत, त्यामध्ये कुठही तडजोड केली जाणार नाही. त्यात कोणाला सोडलं जाणार नाही. त्याच्या खोलात जाऊ जो कोणी दोषी असेल, जो कोणी अधिकारी, कंत्राटदार असेल त्याला काळ्या यादीत टाकू. परत त्याला कुठलही काम नाही मिळालं पाहीजे.
अशाप्रकारच्या घटना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत घडता कामानये. अशा पद्धतीचा निश्चय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे.' अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.