Ajit Pawar News : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. त्यांचे वडिल शहाजीराजे यांना हिंदूचे हिंदुराष्ट्र करायचे होते. शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे लेबल चिकटवले गेले आहे, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांना (संभाजी भिडे) जे वाटतं ते बोलू शकतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती.छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते.
सौगत ए मोदी कीटचे वाटप करण्यात ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना करण्यात येणार आहे. त्यावर राजकीय हेतुने ही मदत केली जात असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, चांगला काही कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटून घ्यायचं काय? सर्वधर्मसमभाव हे आपल्या देशाचे परंपरा आहे. ज्या पद्धतीने इतर सण असतात त्या पद्धतीने रमजान महिना देखील महत्त्वाचा असतो. त्यानिमित्त काही घटकाला शुभेच्छा देण्याकरता हा कार्यक्रम आणला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा तसेच इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने त्याचा गुन्हा देखील कबूल केला आहे. त्याविषयी बोलतना अजित पवार म्हणाले, प्रशांत कोरटकरणे गुन्हा कबूल केला असेल तर त्याबाबतची कागदपत्र तयार करून संबंधित व्यवस्थेसमोर मांडले जातील आणि दोषी असेल त्यांना शासन केलं जाईल.
अजित पवार म्हणाले, अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केलं.यामुळे अनेक लक्षवेधी व प्रश्न मार्गी लागले. विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे ते वेगळे काही तरी मुद्दे काढत आहेत. सभागृहात विरोधकांची उपस्थिती जास्त नव्हती, फार कमी लोक उपस्थिती रहायचे. आमच्याकडे पूर्ण बहुमत असताना देखील रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.