Ajit Pawar News : अमित शहांकडे केली अजितदादांनी मोठी मागणी; विधानसभेच्या 'त्या' सहा जागेवर केला दावा

Political News : लोकसभेप्रमाणे शेवटच्या क्षणांपर्यत जागावाटपाच्या चर्चेत गुंतून न राहण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जागावाटपासंबधी चर्चा केली.
Ajit Pawar and Amit Shah
Ajit Pawar and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे बॅकफूटवर आलेल्या महायुतीने आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यातील सत्ता राखण्यासाठी महायुतीने रणनीती आखली आहे.

लोकसभेप्रमाणे शेवटच्या क्षणांपर्यत जागावाटपाच्या चर्चेत गुंतून न राहता लवकर जागावाटप करून प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठीच बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यासोबत जागावाटपासंबधी चर्चा केली. (Ajit Pawar News)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या 80 ते 90 जागांवर निवडणूक लढवायची असल्याचे शहांना सांगितले. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या. त्याशिवाय काँग्रेसने जिंकलेल्या 20 जागा मागितल्या आहेत.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे तीन आणि अपक्ष तीन असे आणखी सहा आमदार आपल्यासोबत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यापैकी काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली असून त्यांच्यासाठीच ते जागा मागत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सकाळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावेळी दोघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत 54 जागा जिंकल्या होत्या. त्याशिवाय काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आणखी 20 जागा हव्या आहेत. या जागा 2019 मध्ये काँग्रेसनं जिंकल्या होत्या, त्या जागेवर दावा केला आहे.

Ajit Pawar and Amit Shah
Shrijaya Chavan News : वडिलही मातब्बर, दोनवेळचे मुख्यमंत्री; तरीही नातीला आली आजोबांची आठवण!

मुंबईच्या शहरी भागात असलेल्या 4 ते 5 जागांसाठी अजित पवार सर्वाधिक आग्रही आहेत. या जागांवर अल्पसंख्याक लोकवस्ती अधिक आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्या जागा त्यांना हव्या आहेत. त्या जागेवरील उमेदवार ही फायनल केले असून त्यांच्यासाठी त्यांना या जागा हव्या असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यापैकी काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यासाठीच पाच-सहा जागा अजितदादांनी मागितल्या असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

Ajit Pawar and Amit Shah
Nilesh Lanke : लंकेंनी 'LCB'च्या हप्त्यांचं रेटकार्ड केलं जाहीर; भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्यानं 'LCB' पुरती घायाळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com