Ajit Pawar Politics : अजितदादांचे 'मिशन महाराष्ट्र', स्थानिकसााठी रणनीती ठरली; फक्त तीन दिवस मुंबईत अन्...

Ajit Pawar NCP Election Strategy : राष्ट्रवादी काँग्रेसची दरआठवड्यावाला बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : विधानसभेत विजय मिळाला असला तरी गाफील राहायचे नाही, हे महायुतीने ठरवले आहे. त्यामुळे महायुतीमधील पक्षांकडून आत्तापासूनच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. या तयारीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रणनिती ठरवली आहे.

अजित पवार हे सोमवार ते बुधवार मंत्रालयात शासकीय कामकाज पाहणार आहेत. त्यानंतर गुरुवार ते रविवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यातून पक्ष संघटना मजबूत करणे आणि स्थानिक स्वराज निवडणुकीची तयारी करण्याची रणनीती असणार आहे.

Ajit Pawar
Tanisha Bhise Death Case : "पैसे नकोत पण..."; तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी शिंदेंच्या शिवसेनेची 5 लाखांची आर्थिक मदत नाकारत केली मोठी मागणी

साप्ताहिक बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची दरआठवड्यावाला बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत निधीअभावी कामं रखडता कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकारी, आमदारांना दिल्या आहेत.

मंत्रिपद फिक्स समजू नका

साप्ताहिक बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उशीरा पोहोचले होते. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना खडसावल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत कोणीही आपले मंत्रिपद फिक्स समजू नका मी दोनवेळा पाहिलं आणि तिसऱ्यांदा बदल करेल, असा इशाराही अजित पवारांन दिल्याचे समजते.

महापालिका स्वबळावर?

महायुतीमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या निवडणुका महायुती म्हणून न लढता तीनही पक्ष स्वबळावर लढण्याची चाचपणी करत आहेत. उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेत महायुती होईल अन्यथा सर्वत्र स्वबळावर निवडणूक लढली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Ajit Pawar
Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणी कमी होईनात... आता अजित पवारांची नाराजी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com